भाषणात गुजरातचाच उदोउदो..

By admin | Published: July 11, 2014 02:57 AM2014-07-11T02:57:57+5:302014-07-11T02:57:57+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणातही निवडणुकीतील प्रचाराप्रमाणोच गुजरातचा उदोउदो करण्यात आला.

Speaking in Gujarat .. | भाषणात गुजरातचाच उदोउदो..

भाषणात गुजरातचाच उदोउदो..

Next
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या भाषणातही निवडणुकीतील प्रचाराप्रमाणोच गुजरातचा उदोउदो करण्यात आला. संपूर्ण भाषणात गुजरातचा उल्लेख 4 वेळा करण्यात आला, तर महाराष्ट्राचा उल्लेख 2 वेळा केला गेला.
 
अर्थसंकल्पात महाराष्ट्र
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने पुढील 
बाबी मिळाल्या.
 
1 देशातील चार राज्यांमध्ये एम्स (अकटटर) रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यामध्ये विदर्भाचा समावेश आहे. यासाठी एकूण 5क्क् कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
2 उच्च शिक्षणाचा दर्जा जागतिक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था, अर्थात आयआयएमची स्थापना केली जाईल. यासाठी 5क्क् कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
3 पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, अर्थात एफटीआयला ‘राष्ट्रीय दर्जा’ देण्यात आला असून, येथे राष्ट्रीय अॅनिमेशन, गेमिंग आणि स्पेशल इफेक्ट केंद्र उभारले जाणार आहे.
4 पुण्यात राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोअर प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी प्राथमिक स्वरूपात 1क्क् कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. देशभरातील औद्योगिक मार्गिकांच्या विकासात येथून समन्वय साधला जाईल.
5पुणो येथे जैवतंत्रज्ञान क्लस्टर सुरू केले जाणार आहे.
6बंगळुरू-मुंबई आर्थिक कॉरिडोअरच्या पूर्णत्वासाठी देशभरात 2क् नवीन औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहेत.
7देशभरात नव्याने 16 बंदरांची निर्मिती केली जाणार असून, यासाठी अर्थसंकल्पात 11,635 कोटींची तरतूद केली आहे. तसेच मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर, अर्थात जेएनपीटी विशेष औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित केले जाणार आहे.
8देशातील सात राज्यांमधून जाणा:या अमृतसर-कोलकाता औद्योगिक मार्गिकेअंतर्गत स्मार्ट शहरांच्या उभारणीचे काम वेगाने केले जाईल. औरंगाबादनजीकच्या शेंद्रा-बिडकीन येथेही स्मार्ट औद्योगिक शहर उभारले जाणार आहे.
 

 

Web Title: Speaking in Gujarat ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.