उन्हाळी सुटीसाठी विशेष एसी ट्रेन
By admin | Published: March 12, 2016 04:04 AM2016-03-12T04:04:22+5:302016-03-12T04:04:22+5:30
उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल
मुंबई : उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल. त्यामुळे गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्यांना ऐन उन्हाळ्यात गारेगार प्रवासाचा अनुभव मिळेल.
ट्रेन नंबर 0१00५ एलटीटी ते करमाळी एसी विशेष ट्रेन एलटीटीहून प्रत्येक शुक्रवारी १.१0 वाजता सुटेल. करमाळी येथे त्याच दिवशी ही ट्रेन ११.३0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१00६ करमाळी ते एलटीटी ट्रेन करमाळी येथून १.१0 वाजता दर शुक्रवारीच सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी 00.२0 वाजता पोहोचेल. एसी ट्रेन १४ डब्यांची असेल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या ट्रेनबरोबरच दादर-सावंतवाडी-दादर विशेष ट्रेनही सोडण्यात येणार असून, ती फक्त झारापपर्यंत धावेल. ही ट्रेन आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे. ट्रेन नंबर 0१0९५ दादरहून प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि
ती सावंतवाडी येथे त्याच दिवशी रात्री ८.३0 वाजता पोहोचेल. १७
एप्रिल ते ७ जूनपर्यंत ही ट्रेन
धावणार आहे. त्याचबरोबर ट्रेन नंबर 0१0९६ सावंतवाडीहून प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ४.५0 वाजता सुटून दादर येथे
त्याच दिवशी दुपारी ३.५0 वाजता पोहोचेल. १८ एप्रिल ते ८ जूनपर्यंत ही ट्रेन धावेल. (प्रतिनिधी)