गणपतीनिमित्त पुण्याहून विशेष बसगाड्या
By Admin | Published: September 12, 2015 04:42 AM2015-09-12T04:42:51+5:302015-09-12T04:42:51+5:30
गौरी गणपतीच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार
पुणे : गौरी गणपतीच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये १४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान चिपळूण, मालवण, गुहागर, दापोली, देवरुख, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, महाड या ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
तसेच वरील ठिकाणी जाण्यासाठी ४४ जणांचा गट असल्यास त्यांना विशेष बस उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली असल्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. या आरक्षणाची सुविधा एसटीच्या स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे रेल्वे स्टेशन या बसस्थानकांवरून व एसटीच्या मान्यताप्राप्त खासगी एजंटमार्फत संगणकीय आरक्षणाव्दारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)