मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:56 PM2019-07-17T12:56:27+5:302019-07-17T12:56:52+5:30

दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

Special campaign for voter registration | मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

googlenewsNext

जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या अनुषंगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदविता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी संधी दिली असून यासाठी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै २०१९ या दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाडीलकर बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार कळसकर आदी उपस्थित होते.
मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत, मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै २०१९ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे विविध टप्पे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. तर १५ ते ३० जुलै या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. २१ व २१ आणि २७ व २८ जुलै या तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ आॅगस्ट रोजी पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून तपासणी होवून आलेले दावे व हरकती १३ आॅगस्ट २०१९ रोजी निकाली काढण्यात येणार असून १६ आॅगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी निवडणूक, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार याद्यांची तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, परवणी याद्यांची छपाई इत्यादी कामे पूर्ण करण्यात येणार असून १९ आॅगस्ट रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
मतदार याद्यांच्या दुसºया विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय सहभाग नोंदवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

Web Title: Special campaign for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव