Ganpati Special Extra Trains: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावरून विशेष एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 06:42 AM2019-08-30T06:42:59+5:302019-08-30T12:18:14+5:30
Extra Konkan Trains : रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस तीन विशेष एक्स्प्रेस ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सुटतील.
मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी यादरम्यान सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येतील. यासह दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला ४ जादा डबे जोडण्यात येतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीदरम्यान तीन विशेष एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ८.५० वाजता सुटून रत्नागिरी येथे ६.४० वाजता पोहोचेल.
रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस तीन विशेष एक्स्प्रेस ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस रत्नागिरी येथून सकाळी ८ वाजता रवाना होऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी ४.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा दिला जाईल.
तुतारी एक्स्प्रेस २३ डब्यांची
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कोकणात जाण्यासाठी तुतारी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास प्रवासी पसंती देतात. त्यामुळे या एक्स्प्रेसला जादा तीन स्लीपर क्लास आणि एक सामान्य डबा जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्लीपर क्लासचे डबे ७ वरून १० करण्यात आले आहेत. तर, सामान्य डबे ८ वरून ९ करण्यात आले आहेत. तुतारी एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत २३ डबे जोडून धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.