गर्डरसाठी 'मध्य रेल्वे'वर रात्रकालीन सव्वा पाच तासांचा विशेष मेगाब्लॉक, मेल-एक्स्प्रेस गाड्या धावणार उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 02:01 PM2017-08-25T14:01:02+5:302017-08-25T14:06:45+5:30
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 2 व 3 दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर 5 तास 15 मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी (26 ऑगस्ट) रात्री 12.50 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.05 वाजेपपर्यंत मुलुंड ते कळवादरम्यान धीम्या मार्गावरील अप आणि डाऊनची वाहतूक जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.
मुंबई, दि. 25 - ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 2 व 3 दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर 5 तास 15 मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी (26 ऑगस्ट) रात्री 12.50 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 6.05 वाजेपपर्यंत मुलुंड ते कळवादरम्यान धीम्या मार्गावरील अप आणि डाऊनची वाहतूक जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. यामुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या साधारणतः 10 ते 20 मिनिटे उशीरानं धावण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री 12.34 ते रविवारी सकाळी 6.10 या वेळेते डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते दिवा मार्गावरील लोकल मुलुंड ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येईल. तर अप धीम्या मार्गावरील लोकल पहाटे 3.48 ते पहाटे 5.53 दरम्यान दिवा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यता येईल. त्यामुळे या कालावधीत लोकल गाड्या कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबवणार नाहीत. डाऊन धीम्या मार्गावरील सीएसएटी ठाणे (रात्री 12.34 आणि सकाळी 6.48 वाजताची लोकल ) तर सीएसएमटी डोंबिवली (सकाळी 6.32 आणि 7.16 वाजताची लोकल ) रद्द करण्यात आली आहे. अप मार्गावरील कल्याण-सीएसएमटी (रात्री 9.20 वाजताची लोकल), कल्याण-ठाणे (रात्री 11.39, 11.58 वाजताची लोकल) तसंच ठाणे सीएसएमटीदरम्या पहाटे 4 ते 6.16 वाजेपर्यंतच्या आठ लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
डोंबिवली सीएसएमटी (सकाळी 8.14 आणि 8.41) ची लोकलही रद्द करण्यात आली आहे. तर सीएसएमटी-कल्याण (रात्री 10.24), सीएसएमटी-ठाणे (रात्री 11.39), सीएसएमटी-ठाणे (रात्री 11.59) लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच धावेल. कुर्ला-अंबरनाथ लोकल कुर्ला स्थानकाऐवजी मुंब्रा स्थानकातून चालवण्यात येईल. पहाटे 5.28 वाजता सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी सुटणारी लोकल आणि सीएसएमटीहून सकाळी 6.12 ची टिटवाळा लोकल मुंब्रा स्थानकातून टिटवाळा निघेल.