कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:38 AM2022-12-24T05:38:21+5:302022-12-24T05:39:12+5:30

रेल्वेच्या वेळापत्रकांवर होणार परिणाम.

Special night block on Saturday Sunday on Kalyan Kasara route indian railways | कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक

कल्याण-कसारा मार्गावर शनिवारी-रविवारी विशेष नाइट ब्लॉक

googlenewsNext

मुंबई : कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी शनिवारी-रविवारी  रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.

या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी स्थानकातून शनिवारी रात्री १०.५०वाजता सुटणारी कसारा लोकल आटगाव स्थानकांपर्यतच धावणार आहे. रात्री १२.१४ची सीएसएमटी ते कसारा आणि रविवारी पहाटे ३.५१ची कसारा-सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत.  ट्रेन क्रमांक २२५३८ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसला खडवली ते कसारादरम्यान आणि ११४०२ अदिलाबाद ते मुंबई एक्स्प्रेसला कसारा ते खडवली स्थानकांदरम्यान थांबविण्यात येणार आहे. 

असा आहे ब्लॉक 
     कसारा-खर्डी अप मार्गावर रात्री १२.३० ते मध्य रात्री ३.४५ वाजेपर्यंत
     वासिंद-आटगाव अप आणि डाऊन मार्गावर मध्यरात्री २.२० ते पहाटे ४.२० वाजेपर्यंत 
     खडवली-आसनगाव अप आणि डाऊन मार्गावर मध्यरात्री २.०५ ते पहाटे ५.०५ वाजेपर्यंत 
     खडवली-आंबिवली अप मार्गावर मध्य रात्री १.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत

या गाड्या उशिराने धावणार
गोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमृतसर- सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल व्हाया नागपूर, शालीमार-एलटीटी समरस्ता एक्स्प्रेस, सिकंदराबाद- सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस

Web Title: Special night block on Saturday Sunday on Kalyan Kasara route indian railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.