आंगणेवाडी जत्रेसाठी रेल्वेच्या विशेष फेऱ्या
By Admin | Published: February 8, 2016 03:56 AM2016-02-08T03:56:54+5:302016-02-08T03:56:54+5:30
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हे पाहता कोकण आणि मध्य रेल्वेने विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई : आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. हे पाहता कोकण आणि मध्य रेल्वेने विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान या फेऱ्या सीएसटी, दादर टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्यात येणार आहेत.
दादर - सावंतवाडी - दादर
ट्रेन नंबर 0१0९५ दादरहून २३ आणि
२५ फेब्रुवारी रोजी ७.५0 वाजता सुटेल. ट्रेन नंबर 0१0९६ सावंतवाडी येथून
२४ आणि २६ फेब्रुवारी रोजी सव्वा सहा वाजता सुटेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप
स्थानकांत थांबा मिळेल.
सीएसटी -
झाराप - सीएसटी
ट्रेन नंबर 0१0९१ सीएसटीहून २४ फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजता सुटेल. ट्रेन नंबर 0१0९२ झाराप येथून २५ फेब्रुवारी रोजी 0१.५५ वाजता सुटेल. ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल,रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा.
एलटीटी-
झाराप-एलटीटी
ट्रेन नंबर 0१00५ एलटीटी येथून २३ फेब्रुवारी रोजी 00.४५ वाजता सुटेल. ट्रेन नंबर 0१00६ झाराप येथून याच दिवशी १४.५५ वाजता सुटेल. ट्रेनला ठाणे, पनवेल,
रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबा.
एलटीटी-झाराप-एलटीटी : ट्रेन नंबर 0१0८९ एलटीटीहून २५ फेब्रुवारी रोजी 0१.२0 वाजता सुटेल. ट्रेन नंबर 0१0९0 झाराप येथून याच दिवशी १२.३५ वाजता सुटेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबा.
एलटीटी-झाराप-एलटीटी : ट्रेन नंबर 0१0३३ एलटीटीहून २४ फेब्रुवारी रोजी 0१.१0 वाजता सुटेल. ट्रेन
नंबर 0१0३४ झाराप येथून २४ फेब्रुवारी रोजी १४.५५ वाजता सुटेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल,रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबा.