रूपी बँकेच्या वसुलीसाठी विशेष योजना
By admin | Published: June 21, 2016 03:24 AM2016-06-21T03:24:48+5:302016-06-21T03:24:48+5:30
रुपी को आॅपरेटीव्ह बँकेच्या थकीत कर्ज वसुलीला पुन्हा गती येणार आहे. राज्य सरकारने या बँकेसाठी विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) मंजूर केली आहे.
पुणे : रुपी को आॅपरेटीव्ह बँकेच्या थकीत कर्ज वसुलीला पुन्हा गती येणार आहे. राज्य सरकारने या बँकेसाठी विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) मंजूर केली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाने शनिवारी (दि. १८) काढला आहे. ही योजना २१ आॅगस्टपर्यंत राहणार आहे.
थकीत कर्जामुळे बँकेवर रिझर्व बँकेने प्रशासक नेमल्यानंतर बँकेने नॉन परफॉर्मिंग असेट्स (एनपीए)
कर्ज वसुलीसाठी २१ फेब्रुवारीपर्यंत
ही योजना राबवली होती.
त्यानंतर आतापर्यंत ही योजना बंद होती. ती पुन्हा लागू करण्याबाबत बँकेने प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार राज्य सरकारने योजनेला मंजुरी
दिली आहे. बँकेच्या ठेवीदारांची संख्या सुमारे सहा लाख २२ हजार असून ठेवींची रक्कम सुमारे १५१६ कोटी रुपये आहे. बँकेचे अन्य बँकेत विलिनीकरण करण्याच्या दृष्टीने
प्रयत्न सुरू आहेत. कजर्दार दिलेल्या मुदतीत संपूर्ण रक्कम भरू शकले नाहीत, तर अशा कर्जदारांना पुढील सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रशासक मंडळाला
राहणार आहे. मात्र संबंधित कर्जखात्यांसाठी ‘ओटीएस’ मंजुरीच्या तारखेपासून किमान १३ टक्के सरळव्याजाने आकारणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)