आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी
By admin | Published: January 5, 2015 05:02 AM2015-01-05T05:02:37+5:302015-01-05T05:02:37+5:30
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समितीची स्थापना करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, नाहीतर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा
मुंबई : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समितीची स्थापना करण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, नाहीतर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मातंग संघाने दिला आहे. मराठा आरक्षण समितीच्या धर्तीवर मातंग समाजाला अनुसूचित जातीत अ, ब, क, ड वर्गवारी करून ‘अ’ प्रवर्गात ८ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन करण्याची संघटनेची मागणी आहे.
अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला आहे.’ दरम्यान, मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मराठी समाजाच्या पार्श्वभूमीवर समितीची स्थापन करावी. अनुसूचित जातीत वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी संघटनेची मागणी आहे. अन्यथा आझाद मैदानात हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)