गोविंद पानसरे हत्येतील फरारी आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:01 AM2017-12-19T03:01:21+5:302017-12-19T03:01:45+5:30

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

Special squad for finding absconding accused in Govind Pansare murder case | गोविंद पानसरे हत्येतील फरारी आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक

गोविंद पानसरे हत्येतील फरारी आरोपींना शोधण्यासाठी विशेष पथक

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा व चौथा संशयित आरोपी विनय पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड) व सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दोघांच्या अटकेची पूर्तता करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासंबंधी आढावा बैठक झाली. यावेळी तपास अधिकारी व सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते.
पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या तपासाचा तात्पुरता अधिकार इचलकरंजी विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याकडे सोपविण्यात आला. पूर्णवेळ काम करणारा अधिकारी लवकर द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
हत्येचा छडा कधी लागणार; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मुंबई : नरेंद्र्र दाभोलकर यांच्या हत्येला ५२ महिने पूर्ण होत आहेत. गोंविद पानसरे यांच्या हत्येला ३६ महिने पूर्ण होत आहेत. २३ महिन्यांपूर्वी प्रा.कलबुर्गी यांची हत्या झाली. एवढे महिने उलटूनही मारेकºयांना अटक करण्यात आली नाही. परिणामी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संताप व्यक्त करत काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.
सनातनावर संस्थेवर बंदी यावी, असा प्रस्ताव २०११ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना करण्यात आला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संस्थेला भेट देऊनही याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शासनाने सनातनवरील कारवाईविषयी भूमिका जाहीर करावी अशी मागणीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Special squad for finding absconding accused in Govind Pansare murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.