शाळा कॉलेज परिसरात पोलिसांचे विशेष पथक
By admin | Published: December 19, 2014 02:45 AM2014-12-19T02:45:05+5:302014-12-19T02:45:05+5:30
मुंबईसह राज्यातील शाळा, कॉलेज परिसरात होणारी अमलीपदार्थांची अवैध विक्र ी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येईल
नागपूर : मुंबईसह राज्यातील शाळा, कॉलेज परिसरात होणारी अमलीपदार्थांची अवैध विक्र ी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत केली.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची विक्री केली जात आहे. यामध्ये विशेषत: शाळा, कॉलेजचे विद्यार्थी टार्गेट केले जातात याकडे विधानसभेतील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना अॅड. आमदार आशिष शेलार यांनी काही अमलीपदार्थ विकणाऱ्या टोळ्या शाळा, कॉलेज मधील तरुणांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढत असून या टोळ्या शाळा आणि महाविद्यालय परिसरात सक्रि य असल्याचे सांगत गृहविभागाला घरचा आहेर दिला. वांद्रे परिसरात अशा टोळ्या सक्रि य असल्याचे दिसून आले असून नॅशनल कॉलेज परिसर आणि शास्त्रीनगर, कुरेशीनगर वांद्रे येथील झोपडपट्टीत अशा अवैधरीत्या अमलीपदार्थ विकणाऱ्या टोळक्यांना पकडण्यात आले होते. गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, यासाठी पथके नियुक्त करण्यात येतील आणि शाळा कॉलेज परिसरात विशेष नजर ठेवण्यास त्यांना सांगण्यात येईल तसेच मेफेड्रोन (एमडी) ड्रगची विक्री राज्यात ठिकठिकाणी नव्याने झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या ड्रगला एनडीपीसीमध्ये समविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)