‘दाभोलकर हत्येच्या तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमा’
By admin | Published: May 21, 2017 02:03 AM2017-05-21T02:03:25+5:302017-05-21T02:03:25+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला शनिवारी ४५ महिने पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्यांच्या मारकेऱ्यांना पकडण्यात
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला शनिवारी ४५ महिने पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्यांच्या मारकेऱ्यांना पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाल लालवाणी, दीपक गिरमे आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातील प्रमुख संशयित असलेले सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचे सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात सीबीआयला यश आलेले नाही.