मुंबईत खड्डे बुजविण्यासाठी पालिकेचं विशेष पथक

By admin | Published: July 2, 2016 08:23 PM2016-07-02T20:23:07+5:302016-07-02T20:24:49+5:30

मुंबईतील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज घेतला.

A special team of the municipal corporation to build potholes in Mumbai | मुंबईत खड्डे बुजविण्यासाठी पालिकेचं विशेष पथक

मुंबईत खड्डे बुजविण्यासाठी पालिकेचं विशेष पथक

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - मुसळधार पावसाने दररोज मुंबई आणखीनच खड्ड्यात जात आहे. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीची गती मंदावली आहे. त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजविण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज घेतला. 
 
गेले काही दिवस मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे छोटे व मुख्य रस्तेही खड्ड्यात गेले आहेत, दोनच दिवसांत दीडशे खड्डे मुंबईतील रस्त्यांवर पडले आहेत. 1 जुलैर्पयत 244 खड्ड्यांची नोंद झाली आहे. यापैकी केवळ दोनच खड्डे बुजविण्याची शिल्लक असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
 
प्रत्यक्षात अनेक मुख्य रस्ते आजही खड्ड्यात आहेत. मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने खड्डे भरणो शक्य होत नाही. त्यामुळे खड्डे आणखीनच वाढत असून मुंबईकरांना खड्ड्यातूनच वाट काढावी लागत आहे. याची दखल आयुक्तांनीच घेतली आहे. खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथकच नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
 
जंक्शनवर विशेष लक्ष
रस्त्यावरील जंक्शनवर वाहतुकीचा वेग कमी असतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण जास्त असते. ही बाब लक्षात घेऊन जंक्शनवरच्या खड्ड्यांबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेश आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत अधिका:यांना दिले. 
 
1 जुलैर्पयत खड्ड्यांची आकडेवारी
विभागखड्डे        शिल्लक
शहर         73         नाही
पश्चिम उपनगर     124  नाही
पूर्व उपनगर     47     02
 
* कुर्ला विभागात दोन ठिकाणी खड्डे भरणे अजून शिल्लक आह़े
 
* ग्रँटरोड, कुलाबा,भायखळा, अंधेरी, मालाड, चेंबूर या विभागात सर्वाधिक खड्डे आहेत़ 
 

Web Title: A special team of the municipal corporation to build potholes in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.