मध्य व कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन
By Admin | Published: January 18, 2017 04:12 AM2017-01-18T04:12:12+5:302017-01-18T04:12:12+5:30
प्रवाशांची गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : प्रवाशांची गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एलटीटी-मडगाव, मडगाव-नागपूर-मडगाव, मडगाव-सीएसटी,एलटीटी-करमाळी-एलटीटीचा समावेश आहे.
ट्रेन नंबर 0१00५ एलटीटी-मडगाव२५ जानेवारी रोजी एलटीटीहून १६.५५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ४.00 वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात येईल.
ट्रेन नंबर 0१0८४ मडगाव-नागपूर २६ जानेवारी रोजी मडगाव येथून १0.४0 वाजता सुटून नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. या ट्रेनला थिविम, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, भुसावळ, वर्धा स्थानकात थांबा देण्यात येईल.