खूशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 12:29 PM2020-08-08T12:29:33+5:302020-08-08T12:37:12+5:30
कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात.
डोंबिवली - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 26 जुलै रोजी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार करत तसेच ट्विट करत कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
26 जुलै रोजी मनसे आमदार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले होते आणि ट्विट केले होते.आपल्या पत्रात त्यांनी कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी केली होती.तसेच त्यांनी पत्रात म्हंटले होते की कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना (COVID-19) विषाणूचे संकट संपूर्ण देशासह राज्यावर आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही लॉकडाऊन सुरू असून जवळ जवळ चार महिन्यांपासून कंपन्या,व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. यामध्ये बहुतांश जणांचा रोजगार बुडाला असून,आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने अव्वाच्या सव्वा खाजगी ट्रॅव्हलला भाडे देऊन गावी जावे लागत आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील नोकरदार हतबल झाला आहे. वास्तविक महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक सह इतर रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी अशी माझ्यासह अनेक संघटनांनी विनंती केली होती. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. मात्र इतर राज्यात सुरू करण्यात आलेल्या गाड्यामधून लाखो नागरिक त्यांच्या राज्यात गेले व परत महाराष्ट्रातही आले. परंतु महाराष्ट्रातील जनतेला या गाड्यांचा काहीही फायदा झालेला नाही. किमान गणेशोत्सवासाठी तरी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी