पाण्यावरही चालणाऱ्या विशेष वाहनाचे गोव्यात उदघाटन

By admin | Published: October 11, 2016 03:20 PM2016-10-11T15:20:28+5:302016-10-11T15:20:28+5:30

पाण्यावर आणि जमिनीवर चालू शकेल अशा भारतातील पहिल्या विशेष वाहनाचे मंगळवारी गोव्यात उदघाटन करण्यात आले

The special vehicle running on the water opened in Goa | पाण्यावरही चालणाऱ्या विशेष वाहनाचे गोव्यात उदघाटन

पाण्यावरही चालणाऱ्या विशेष वाहनाचे गोव्यात उदघाटन

Next
>ऑनलाइन लोकमत
 
पणजी, दि. ११ -  पाण्यावर आणि जमिनीवर चालू शकेल अशा भारतातील पहिल्या विशेष वाहनाचे मंगळवारी गोव्यात उदघाटन करण्यात आले. त्यानंतर या वाहनात बसून मुख्यमंत्री  लक्ष्मीकांत  पारसेकर तसेच पर्यटन मंत्री  दिलीप परुळेकर यांनी  वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  मांडवीतील जलसफरीचा आनंद अनुभवला.
 
गोव्यात या विशेष वाहनामुळे पर्यटकांची  संख्या आणखी वाढेल. गोव्यात येणारा पर्यटक या वाहनातून  जलसफरीचा आनंद  घेतल्याशिवाय  माघारी जाणारा नाही. गोव्यात आता पर्यटन  चोवीसही महिने सुरू असते, असे मुख्यमंत्री  पारसेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
 
या विशेष वाहनाचे तंत्रज्ञान  अमेरिकेतील आहे पण वाहनाची निर्मिती गोव्यातच करण्यात आली आहे. त्यावर अडिच कोटीचा खर्च आला आहे. अशा प्रकारची आणखी दोन वाहने तयार केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
दरम्यान गोव्यात सध्या पर्यटकांची संख्या  एवढी झाली आहे की खोल्याच रिकाम्या  मिळत नाहीत. सरकारच्या  पर्यटन विकास महामंडळाच्या  सर्व रेसिडन्सीमध्ये 100 टक्के  आरक्षण झालेले आहे असे  पर्यटन मंत्री  परुळेकर यांनी सांगितले. येत्या महिन्यात समुद्रावर उतरणार्‍या  विमानाचे उदघाटन केले जाईल. रोप वे प्रकल्पाची पायाभरणीही नोव्हेंबरमध्ये करू, असे  परुळेकर यांनी सांगितले.

Web Title: The special vehicle running on the water opened in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.