१ नोव्हेंबरपासून वाढणार कोकण रेल्वेचा वेग
By admin | Published: October 20, 2016 03:07 PM2016-10-20T15:07:40+5:302016-10-20T15:07:40+5:30
१ नोव्हेंबर पासून कोकण रेल्वेचे वेलापत्रक बदलणार असून गाड्यांचा वेग वाढणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. २० - पावसाळ्यात अधूनमधून कोसळणाऱ्या दरडी तसेच अन्य घटना लक्षात घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांचा वेग कमी करण्यात येत असतो. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी या मार्गावरील गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक दरवर्षी लागू केले जाते. हे वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून बदलणार असून नविन वेळापत्रक लागू होणार आहे. तसेच गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
1 नोव्हेंबर पासून लागू होणारे नवीन वेळापत्रक पुढील प्रमाणे
कोकणकन्या एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव १८.००, सावंतवाडी १९.३७, कुडाळ २०.०१, सिंधुदुर्ग २०.१२, कणकवली २०.३८, वैभववाडी २०.५८, रत्नागिरी २३.०५, पनवेल ०४.१०, ठाणे ०४.५५, दादर ०५.२०, सीएसटी ०५.५०.
कोकणकन्या (मुंबई ते मडगाव) : सीएसटी २३.०५, दादर २३.२०, ठाणे २३.४५, पनवेल ००.३०, रत्नागिरी ०५.३०, वैभववाडी ०६.५२, कणकवली ७.२०, सिंधुदुर्ग ०७.३७, कुडाळ ७.५५, सावंतवाडी ८.२३, मडगाव १०.४५
मांडवी एक्स्प्रेस (मडगाव ते मुंबई) : मडगाव ०९.१५, सावंतवाडी १०.४४, कुडाळ ११.०६, सिंधुदुर्ग ११.१७, कणकवली ११.३५, वैभववाडी १२.०६, रत्नागिरी १४.००, पनवेल १९.३०, ठाणे २०.४०, दादर २१.०५, सीएसटी २१.४०.
मांडवी एक्स्प्रेस (मुंबई ते मडगाव) : सीएसटी ०७.१०, दादर ०७.२२, ठाणे ०७.४७, पनवेल ०८.२५, रत्नागिरी १३.१०, वैभववाडी १४.३९, कणकवली १५.२०, सिंधुदुर्ग १५.३५, कुडाळ १५.५०, सावंतवाडी १६.१६, मडगाव १८.४५
राज्यराणी (सावंतवाडी-दादर) : सावंतवाडी १८.५०, कुडाळ १९.१०, सिंधुदुर्ग १९.२८, कणकवली १९.४४, नांदगाव २०.००, वैभववाडी २०.२२, रत्नागिरी २२.३०, पनवेल ०४.४५, ठाणे ०५.४५, दादर ०६.४५.
राज्यराणी (दादर-सावंतवाडी) : दादर ००.०५, ठाणे ००.३०, पनवेल ०१.२०, रत्नागिरी ०६.२०, वैभववाडी ०७.५०, नांदगाव १८.१४, कणकवली ०८.३०, सिंधुदुर्ग ०८.४८, कुडाळ ०९.००, सावंतवाडी १०.४०.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर : सावंतवाडी ०९.३०, झाराप ८.४१, कुडाळ ०८.५१, सिंधुदुर्ग ०९.०२, कणकवली ०९.२१, नांदगाव ०९.४२, वैभववाडी ०९.५५, रत्नागिरी ११.५०,दिवा २०.१०.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा ०६.२०, रत्नागिरी १४.००, वैभववाडी १५.२४, नांदगाव १५.४०, कणकवली १५.५७, सिंधुदुर्ग १६.२१, कुडाळ १६.३१, झाराप १६.४१ सावंतवाडी १८.१०.
जनशताब्दी (मडगाव-मुंबई) : मडगाव १४.३०, कुडाळ १५.५०, कणकवली १६.१०, रत्नागिरी १७.४५, चिपळूण १८.४५, पनवेल २१.५०, ठाणे २२.३५, दादर २३.०५.
जनशताब्दी (मुंबई-मडगाव) : दादर ०५.२५, ठाणे ०५.५०, पनवेल ६.३८, चिपळूण ९.२८, रत्नागिरी १०.४५, कणकवली ११.५८, कुडाळ १२.२२, मडगाव १४.०५
डबलडेकर (मडगाव-एलटीटी) : मडगाव ०६.००, सावंतवाडी ०७.२२, कणकवली ०८.१५, रत्नागिरी १०.१०, चिपळूण ११.२८, पनवेल १५.३०, ठाणे १६.१५, एलटीटी १७.५०.
डबलडेकर (एलटीटी-मडगाव) : एलटीटी ०५.३३, ठाणे ५.५०, पनवेल ०६.४५, रत्नागिरी ११.४५, कणकवली १३.४०, मडगाव १७.३०
एर्नाकुलम-पुणे : सावंतवाडी १८.२८ आणि कणकवली १९.१२. पुणे-एर्नाकुलम : कणकवली ०३.१४, सावंतवाडी ०३.५८
कणकवली स्थानकात थांबणारी मंगला एक्स्प्रेस (दिल्लीकडे जाणारी) : ०५.४४ आणि केरळकडे जाणारी १७.२०. मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस २०.४० आणि मंगलोर-मुंबई एक्स्प्रेस ०५.१०. ओखा एक्स्रेस (केरळकडे जाणारी) ०४.२४ आणि गुजरातकडे जाणारी १३.४०.
कुडाळ स्थानकात थांबणारी नेत्रावती एक्स्प्रेस (मुंबईकडे जाणारी) : कुडाळ येथे ०७.०६ येईल तर केरळकडे जाणारी २१.०० वाजता येणार आहे. मत्स्यगंधा (मुंबईकडे जाणारी) कुडाळ स्थानकात २२.१६ वाजता थांबेल तर केरळकडे जाणारी मत्स्यगंधा २३.४२ वाजता थांबणार आहे.
मंगलोर ते मुंबई जाणार्या मंगलोर एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. ही गाडी मुंबईला जाण्यासाठी मध्यरात्री १२.०२ वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत रात्री ८.४० वाजता येणार आहे. याखेरीज मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस सध्या दुपारी २.२० वाजता येत आहे. १ नोव्हेंबर पासून ही गाडी कणकवलीत सायंकाळी ४.१० वाजता येणार आहे.(प्रतिनिधी)
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने !
रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार मुंबईकडे जाणार्या बहुतांश गाड्या पूर्वीच्या वेळापत्रकापेक्षा एक ते दोन तास उशिराने सुटणार आहेत. तर मुंबईतील स्थानकात मात्र पूर्वीच्याच वेळेेत पोहोचणार आहेत. याची रेल्वे प्रवाशानी नोंद घ्यावी तसेच सुखकर प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.