रोपे निर्मितीच्या कामाला येणार गती!
By admin | Published: March 5, 2017 01:35 AM2017-03-05T01:35:07+5:302017-03-05T01:35:07+5:30
सामाजिक वनीकरण विभागाला १0 कोटी वितरित
संतोष येलकर
अकोला, दि. ४- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सामग्री व कुशल मजुरीच्या खर्चासाठी शासनामार्फत ३५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध निधीतून राज्यातील रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीसाठी १0 कोटींचा निधी सामाजिक वनीकरण विभागाला १ मार्च रोजी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामाला आता गती येणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी सामग्री आणि कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी गत दोन महिन्यांपासून अनुदान उपलब्ध नव्हते. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांकरिता सामग्री आणि मजुरी खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पृष्ठभूमीवर ह्यनरेगाह्ण अंतर्गत कामांसाठी कुशल खर्च भागविण्याकरिता राज्य शासनामार्फत अखेर गत २८ फेब्रुवारी रोजी ह्यनरेगाह्ण आयुक्त कार्यालयाला ३५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. उपलब्ध निधीतून राज्यातील सर्वच जिल्ह्यात रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्याकरिता १0 कोटींचा निधी नरेगा आयुक्त कार्यालयामार्फत १ मार्च रोजी सामाजिक वनीकरण विभागाला वितरित करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाला निधी उपलब्ध झाल्याने, येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी लागणार्या रोपांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात रोप वाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामे सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने राज्यात रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामांना गती येणार आहे.
कृषी विभागासह ग्रामपंचायतींच्या कामांसाठीही मिळणार निधी!
ह्यनरेगाह्ण अंतर्गत कृषी विभाग आणि राज्यातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार्या विविध कामांसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींच्या कामांसाठीही ह्यनरेगाह्ण राज्य आयुक्त कार्यालयामार्फत सोमवारी निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने ह्यनरेगाह्ण अंतर्गत सिंचन विहिरी, शेततळी, फळबाग लागवड, शौचालयांची बांधकामे व इतर कामांचा खर्च भागविण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.
'नरेगा' अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात येणार्या कामांसाठी सामग्री व कुशल मजुरीचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत ३५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामध्ये रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीच्या कामांसाठी १0 कोटींचा निधी सामाजिक वनीकरण विभागाला वितरित करण्यात आला असून, कृषी विभागासह ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणार्या विविध कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
-अभय महाजन
राज्य आयुक्त, नरेगा, नागपूर