झोपडय़ांच्या पुनर्वसनाला वेग
By Admin | Published: August 5, 2014 11:59 PM2014-08-05T23:59:51+5:302014-08-05T23:59:51+5:30
रस्त्यांमध्ये बाधित होणा:या, तसेच धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांचे केंद्र शासनाच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत करण्यात येणारे पुनर्वसन आता वेगाने होणार आहे.
पुणो : रस्त्यांमध्ये बाधित होणा:या, तसेच धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांचे केंद्र शासनाच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत करण्यात येणारे पुनर्वसन आता वेगाने होणार आहे. ही घरे देण्यासाठी झोपडपट्टीधारकांशी पालिकेकडून करण्यात येणा:या करारांच्या नोंदणीसाठी ई- रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महापालिकेने केंद्र शासनाच्या जेएनएनयूएम योजनेअंतर्गत बीएसयूपी योजनेमधून वारजे आणि हडपसर येथे सुमारे साडेतीन हजार घरे बांधलेली आहे. या घरांमध्ये शहरात रस्ता रुंदीकरण, महापालिकेचे प्रकल्प, डोंगरमाथ्यावर उतारावरील झोपडपट्टय़ा, नाले, तसेच नदीपात्रत झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक यांचे पुनर्वसन केले जाते. त्यानुसार, शहरातील अनेक भागातील झोपडपट्टीवासीय, तसेच प्रकल्पग्रस्तांचे काम महापालिकेने सुरू केलेले आहे. मात्र, ही घरे संबंधितांना देताना महापालिकेकडून दुय्यम निबंधकाकडे करार केला जातो. मात्र, हे करार करताना दिवसाला एक ते दोनच करार होत आहेत. त्यामुळे नागरिक तयार असूनही त्यांचे पुनवर्सन रखडत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हे पुनर्वसन आणखी रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे तत्काळ करारासाठी ई- रजिस्ट्रेशन सुरू
करण्यात येणार असल्याचे कर्णे गुरुजी यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थीना
थेट करारावर सह्या करण्यासाठीच यावे लागणार असून, वेळेची बचतही होणार आहे.(प्रतिनिधी)
च्जयदेवनगर येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन रखडल्याने स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिकेने ई-रजिस्ट्रेशन सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ याबाबतचा प्रस्ताव समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यामुळे ही नोंदणी तत्काळ सुरू केली, तरच त्याचा लाभ झोपडपट्टीधारकांना होणार आहे. अन्यथा, समितीचा हा निर्णय केवळ स्टंटबाजी ठरणार आहे.