मरिन ड्राइव्हवर ३ मार्चपासून रंगणार वेगाचा थरार

By admin | Published: February 27, 2017 04:35 AM2017-02-27T04:35:00+5:302017-02-27T04:35:00+5:30

मुंबईकरांची पावले, ‘क्वीन नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्ह समुद्रकिनारी हमखास वळतात.

The speed of the train will be on Marine Drive from March 3 | मरिन ड्राइव्हवर ३ मार्चपासून रंगणार वेगाचा थरार

मरिन ड्राइव्हवर ३ मार्चपासून रंगणार वेगाचा थरार

Next


मुंबई : धावपळीच्या आयुष्यातून काहीवेळ निवांतपणा शोधण्यासाठी मुंबईकरांची पावले, ‘क्वीन नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरिन ड्राइव्ह समुद्रकिनारी हमखास वळतात. परंतु आता याच ठिकाणी मुंबईकरांना ‘पॉवरबोट’ रेसिंगचा तुफानी थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ३ ते ५ मार्च दरम्यान होणाऱ्या या शर्यतीसाठी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
समुद्रात खेळवली जाणारी ‘एफवन रेस’ अशा सोप्या भाषेत ओळखल्या जाणाऱ्या या ‘पी वन पॉवरबोट’ इंडियन ग्रँड प्रिक्स शर्यतीसाठी एचव्हीआर रेसिंग, एललॉयड डॉल्फिन्स, बूस्टर जेट्स, अल्ट्रा शाकर््स, मनी आॅन मोबाइल मार्लिन्स आणि टीम ६ अशा एकूण सहा संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सीएस संतोष (बूस्टर जेट्स) आणि गौरव गिल (अल्ट्रा शाकर््स) या दोन भारतीयांचा सहभाग आहे.
प्रत्येक संघाच्या दोन जेटबोट्स या शर्यतीत सहभागी होणार असून प्रत्येक बोटमध्ये ड्रायव्हर व नेव्हीगेटर (मार्गदर्शक) असतील. १ लाख २५ हजार यूएस डॉलरचे पारितोषिकासाठी या सहा संघांमध्ये वेगाचा थरार रंगेल. ‘स्पर्धेचा सराव मी यूके आणि यूएसमध्ये केला असल्याने मुंबईच्या समुद्राशी जुळवून घेणे आव्हान ठरेल,’ असे संतोषने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
>मुंबईमध्ये या खेळासाठी आम्हाला वेगळीच संधी मिळाली आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. बघताना ही शर्यत खूप सोपी वाटते, पण एक पायलट म्हणून ही शर्यत अत्यंत कठिण आहे. लाटा व वेगवान वारा यांचा सामना करत शर्यत जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. त्याचप्रमाणे १२ फूटच्या बोट एकाबाजूला एक राहून नंबर वनसाठी स्पर्धा करतील. याहून मोठे आव्हान दुसरे नसणार. - गौरव गिल, अल्ट्रा शाकर््स
<असा रंगेल थरार...
५.३ किमीच्या मार्गात पॉवरबोटचा थरार रंगले.
शुक्रवारी प्रत्येक संघ ‘टाइम ट्रायल’मध्ये लढेल. यामध्ये प्रत्येक संघ शनिवारच्या पहिल्या शर्यतीसाठी स्थान निश्चित करेल. सर्वोत्तम वेळ नोंदवणारा संघ पोल पोझिशन मिळवेल.
पहिली शर्यत जिंकणारा संघ २० गुणांची कमाई करेल. दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघाला अनुक्रमे १७ व १५ गुण मिळतील.
शनिवारीच होणाऱ्या दुसऱ्या शर्यतीला उलट्या क्रमांकाने सुरुवात होईल. पहिल्या शर्यतीत अखेरच्या स्थानी आलेला संघ यावेळी पहिल्या क्रमांकाने सुरुवात करेल. या दोन्ही शर्यतीतून मिळणाऱ्या एकूण गुणांनुसार रविवारी अंतिम शर्यतीत प्रत्येक संघांचे स्थान ठरेल.

Web Title: The speed of the train will be on Marine Drive from March 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.