लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग द्या

By Admin | Published: September 20, 2016 01:32 AM2016-09-20T01:32:23+5:302016-09-20T01:32:23+5:30

लोहगाव विमानतळाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या.

Speed ​​up the widening of the Lohagaon Airport | लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग द्या

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग द्या

googlenewsNext


पुणे : पुणे महापालिका, एअरपोर्ट अथॉरिटी व एअरफोर्सने समन्वयाने काम करीत लोहगाव विमानतळाच्या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या.
लोहगाव विमानतळ वाहतुकीबाबत बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार जगदीश मुळीक, इंडियन एअरफोर्सचे वेस्टर्न रिजनचे एअर आॅफिसर कमांडिंग इन चीफ भारती, ग्रुप कॅप्टन यू. मनोज, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे पुणे डायरेक्टर अजय कुमार, व्ही. के. सुरी, पी. एम. जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
पुरू सोसायटी ते एअरपोर्ट रोड येथील ९०० मीटर रस्ता ए-बी, ५०१ चौक ते स. नं. २३८ पर्यंतचा ४०० मीटर रस्ता, स. नं. २१४ येथील अस्तित्वातील काँक्रिट रस्ता ते एअरपोर्ट हद्दीपर्यंत प्रस्तावित २८० मीटर रस्ता इ-एफ, ५०१ चौक ते एअरपोर्ट गेटपर्यंतच्या जुन्या रस्त्याचे विस्तारीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पालकमंत्री बापट यांना दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील चर्चे नुसार तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना बापट यांनी या वेळी दिल्या. (प्रतिनिधी)
>गिरीश बापट म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. विमानतळाला जोडणारे रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यांचे तातडीने काम सुरू करावे. तसेच विमानतळालगतच्या १६ एकर जागेवर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे.
>या ठिकाणची कामे महानगर पालिका, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी, एअरफोर्स यांनी समन्वयाने सुरू करावीत. या तिन्ही विभागांनी आपला अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून कमीत कमी वेळेत काम पूर्ण करावे. या कामात कोणतेही अडथळे येत असतील, तर तातडीने ते सोडविण्यावर भर द्यावा.

Web Title: Speed ​​up the widening of the Lohagaon Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.