भरधाव कार-टेम्पाेचा अपघात; दाेघेजण गंभीर, लातूर-बिदर महामार्गावरील निलंगानजीकची घटना
By राजकुमार जोंधळे | Published: October 15, 2022 12:13 AM2022-10-15T00:13:26+5:302022-10-15T00:18:37+5:30
भरधाव कार आणि टेम्पाेच्या अपघातात दाेघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-बिदर महामार्गावरील निलंगा शहरानजीक असलेल्या जाऊ पाटी येथे ११ ऑक्टाेबर राेजी घडला.
लातूर : भरधाव कार आणि टेम्पाेच्या अपघातात दाेघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-बिदर महामार्गावरील निलंगा शहरानजीक असलेल्या जाऊ पाटी येथे ११ ऑक्टाेबर राेजी घडला. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात किल्लारी पाेलीस ठाण्यात कार चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी मनाेज ओमप्रकाश घारुळे (वय २५ रा. मंठाळे नगर, लातूर) हे टेम्पाेने (एमएच २४ एयू ०६५७) प्रवास करत हाेते. दरम्यान, लातूर ते बिदर महामार्गावरील निलंगा शहरानजीक जाऊ पाटी येथे भरधाव कारने (एमएच ०३ बीसी ०८१५) समाेरून राँग साईडने येत जाेराची धडक दिली. या अपघातात फिर्यादीसह अन्य एकजण हे गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय, वाहनाचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून कार चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस हवालदार यादव करत आहेत.