पोलीस भरती प्रक्रियेला वेग; मुख्यालयाकडून रिक्त पदांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:36 AM2022-10-29T06:36:54+5:302022-10-29T06:37:22+5:30

१ नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

speeding up the police recruitment process; The list of vacancies announced by the headquarters | पोलीस भरती प्रक्रियेला वेग; मुख्यालयाकडून रिक्त पदांची यादी जाहीर

पोलीस भरती प्रक्रियेला वेग; मुख्यालयाकडून रिक्त पदांची यादी जाहीर

Next

मुंबई :   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने २०२१मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलीस दलात सहा हजार ७४० पदांसह राज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे. 
१ नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. दि. ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022. mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही.

Web Title: speeding up the police recruitment process; The list of vacancies announced by the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस