स्पेलिंगची पळापळ
By admin | Published: June 25, 2015 01:02 AM2015-06-25T01:02:27+5:302015-06-25T01:02:27+5:30
तुम्ही मित्रांच्या स्पेलिंगच्या चुका अनेकदा काढल्या असतील, पण स्पेलिंगचा गेम कधी खेळला आहे का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल, कारण हा गेमच आहे तसा इंटरेस्टिंग.
तुषार भामरे -
तुम्ही मित्रांच्या स्पेलिंगच्या चुका अनेकदा काढल्या असतील, पण स्पेलिंगचा गेम कधी खेळला आहे का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल, कारण हा गेमच आहे तसा इंटरेस्टिंग.
http://www.arcademics.com/games/spelling-bees/spelling-bees.html या लिंकवर जाऊन तुम्हाला हा गेम खेळता येईल.
मस्त मजेदार असलेला हा गेम तुम्हाला नक्कीच गुंगवून ठेवेल. या गेममध्ये प्रवेश करताना तुम्हाला एक कोड असलेलं नाव देण्यात येईल. उदा: player 456’. . संपूर्ण खेळ तुम्हाला याच नावाने खेळता येईल. या गेममध्ये तुम्हाला तीन स्पर्धक असतील. हे तीन स्पर्धक तुमच्यासारखेच इतर ठिकाणांहून खेळणारे प्लेयर्स असू शकतात. ते नसल्यास कॉम्प्युटरच तुमचा स्पर्धक असतो. खेळ सुरू झाल्यानंतर एबीसीडीची सव्वीस मुळाक्षरे दिसतात. याच वेळी तुम्हाला एका वेळी एक याप्रमाणे शब्द ऐकवले जातात. एका बाजूला घड्याळ दिसतं. एका मिनिटात तुम्ही जितके जास्त स्पेलिंग टाईप कराल तेवढे जास्त गुण मिळतात. गेम खेळताना एक मधमाशी तुम्हाला मदत करेल जी तुम्ही सांगितलेले शब्द स्पेलिंगच्या खाचेत बसवेल. चुकीचं असल्यास मधमाशी ते अक्षर टाकून देते. शेवटी सर्वात जास्त गुण असलेला विनर ठरतो.