फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर ५० कोटी खर्च

By admin | Published: May 23, 2016 04:49 AM2016-05-23T04:49:26+5:302016-05-23T04:49:49+5:30

दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत़ तालुक्यात रोज सुमारे ५०० पाण्याच्या टँकरच्या खेपा फळबागा जगविण्यासाठी सुरू आहेत.

Spending 50 crores for water to live orchards | फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर ५० कोटी खर्च

फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर ५० कोटी खर्च

Next

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
दुष्काळाच्या तडाख्यातून फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर तब्बल ५० कोटी रुपये खर्च केले आहेत़ तालुक्यात रोज सुमारे ५०० पाण्याच्या टँकरच्या खेपा फळबागा जगविण्यासाठी सुरू आहेत.
७० टक्के क्षेत्र ओलिताखाली असलेल्या श्रीगोंदा तालुक्याला दुष्काळाचा चांगलाच तडाखा बसला आहे़ फळबागा जगविण्यासाठी यंदा फेबु्रवारीपासूनच टँकरचा आधार घ्यावा लागला़
तालुक्यातील एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र कुकडी, घोड, भीमा धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आले आहे़ त्यामुळे येथे फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ तालुक्यातील चार हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर लिंबोणीच्या बागा आहेत तर दोन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा आहेत़ याशिवाय ३५० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षे, ७०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा, मोसंबी, आंबा, चिक्कू या फळपिकांच्या बागा आहेत़
दुष्काळामुळे टँकरच्या एका खेपेसाठी शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये मोजावे लागतात़ फेब्रुवारीपासून १५ मे पर्यंत टँकरच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा ५० कोटी रुपयांचा चुराडा झाल्याचे शेतीतज्ज्ञ सांगतात़

Web Title: Spending 50 crores for water to live orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.