मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी

By Admin | Published: January 25, 2017 10:18 PM2017-01-25T22:18:22+5:302017-01-25T22:18:22+5:30

सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. काही खोडकर मतदारही अशांची फिरकी घेताना दिसून येत आहेत. ‘काय खरंच मिळाली का?’ अशी विचारणा करून त्यांना हैराण करीत आहेत.

The spinster inclined to elect voters | मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी

मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी

googlenewsNext

 

महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून, एका प्रभागातून चार उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यामुळे एका पक्षाचे चार उमेदवार पॅनलमध्ये असणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.

 एका एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी, असाच पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण होणार आहे. सर्व जागांसाठी प्रमुख पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे प्रचारातून दिसत आहे. उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पक्षश्रेष्ठी सर्वच इच्छुक उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात प्रचारासाठी फिरत आहेत.  काही पक्षांचे सर्वच इच्छुक एकत्र प्रचार करीत आहेत, तर काही इच्छुक जमेल तसा ‘एकला चलो र’े म्हणत प्रचार करत आहेत.


 

४मागील अनेक महिन्यांपासून निवडणुकीचे जय्यत              तयारीला लागलेले इच्छुक उमेदवार जर ठरावीक पक्षाची उमेदवारी मिळाली, तरच निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत आहेत. सध्या प्रचार करीत आहेत.  मात्र मोजूनमापूनच खर्च करीत आहेत. जर    पक्षाने उमेदवारी दिली, तर खर्च करू म्हणून अनेकांनी सावध भूमिका घेत असल्याचे चित्र सर्वच प्रभागात दिसून येत आहे. मात्र काही इच्छुक उमेदवार पक्षाची उमेदवारी मिळाली तर लढणार व पक्षाची उमेदवारी नाही मिळाली, तरी लढणारच, असा विचार करून प्रचाराला लागले आहेत. 

Web Title: The spinster inclined to elect voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.