जगण्यासाठी चिमुकलीची कसरत

By Admin | Published: July 22, 2016 01:28 AM2016-07-22T01:28:46+5:302016-07-22T01:28:46+5:30

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणारे डोंबारी, पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी ते कसरतीचे खेळ दाखवतात.

Spiral workout for survival | जगण्यासाठी चिमुकलीची कसरत

जगण्यासाठी चिमुकलीची कसरत

googlenewsNext


रहाटणी : विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणारे डोंबारी, पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी ते कसरतीचे खेळ दाखवतात. त्यात अवघी सहा वर्षांची बालिका जीव धोक्यात घालून दोरीवरची कसरत करते. काळजाचा ठोका चुकविणारे तिचे दोरीवरचे खेळ उपस्थितांची टाळ्यांची दाद मिळवून जातात. बक्षीसरूपी शाबासकीही मिळते. मात्र तिच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न चिमुकलीचे खेळ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोे.
अगदी सकाळीच एखाद्या रस्त्यावर, चौकात, सोसायटीच्या आवारात ढोलकीचा आवाज सुरू होतो. ढोलकीचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी गर्दी जमू लागते.आई-वडिलांच्या हाता-खांद्यावर खेळण्या-बागडण्याच्या, शाळेत जाण्याच्या वयात चिमुकली जीवावर बेतेल, असे कसरतीचे खेळ करून दाखवते. जमिनीपासून १० फूट उंचीवर काठीच्या साहाय्याने बांधलेल्या दोरीवर चिमुकल्या नैनाचे खेळ पाहण्यासाठी आलेले थबकतात. स्वत:चा तोल सांभाळत कधी दोरीवरून चालायचे, तर कधी दोरीवर एकावर एक रचलेल्या प्लेटवरून चालायचे अशी ही जीवघेणी, चित्तथरारक कसरत नैनाच्या वाट्याला पदोपदी आली आहे. वडील महेंद्र, आई बिलोरी, दोन वर्षांची धाकटी बहीण रुची यांच्याबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी नैनाची भटकंती सुरू आहे. छत्तीसगढ प्रांतातील बिलासपूर हे त्यांचे मूळ गाव आहे. उपजीविकेसाठी दुसरे कसलेच साधन नसल्याने या कुटुंबाचा असाच प्रवास सुरू आहे. (वार्ताहर)
>शासनाच्या साक्षरता अभियानापासून वंचित
वयाच्या एका वर्षापासून नैना कसरतीचे धडे घेत आहे. पोटाच्या प्रश्नामुळे नैनास शाळेत दाखल न केल्याची खंत नैनाचे वडील बोलून दाखवतात. महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासनाचे साक्षरता अभियान व अन्य समाजोपयोगी उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांना उपयुक्त ठरतात. मात्र, या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. शैक्षणिक उपक्रम नैनाला कधी कामी येणार, नैनाची ही जीवघेणी कसरत कधी थांबणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: Spiral workout for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.