Sanjay Raut : "जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल
By संतोष कनमुसे | Updated: April 3, 2025 18:28 IST2025-04-03T18:24:21+5:302025-04-03T18:28:52+5:30
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Sanjay Raut : "जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut ( Marathi News ) :"तुम्ही खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपावर केली. लोकसभेत काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयक पास झाले. या विधेयकावर आता राज्यसभेत चर्चा सुरू आहे. खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर नितीश कुमारांना पहिला झटका, वरिष्ठ नेत्याने दिला राजीनामा
खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत. मला वाटायचं आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार आहोत. पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र. गाय, बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतता पण आता तुम्हीच स्वत: हिदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात, असा टोला राऊतांनी लगावला.
जमीन घोटाळ्याचा आरोप
यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अयोध्येतील जमीन घोटाळ्यावरुन निशाणा साधला. अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. तु्म्ही हिंदूंच्या जमिनीच्या रक्षा करत नसाल तर मुसलमानांची काय करणार?, असा सवालही राऊतांनी केला. तुमच्या सरकारला जमीन विक्री करायची आहे, असंही राऊत म्हणाले.
वक्फ बोर्डाची देशात किती आहे संपत्ती?#WaqfAmendmentBill#WaqfBillAmendment#WaqfBoard#Marathihttps://t.co/TIhBvaqiTT
— Lokmat (@lokmat) April 3, 2025
"अयोध्येत १३ हजार एकर जमीन घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये ३०० किलो सोनं गायब झाले आहे. धारावीतही जमिनीचे तेच होणार आहे. जर तुम्हाला जमिनीची काळजी असेल तर आमच्या काश्मीरी पंडीतांना अजूनही घर मिळालेले नाही त्यांची काळजी करा. लडाखमध्ये चीन कब्जा तकुन बसले आहे. चीनने घेतलेल्या जमिनीची काळजी करा, असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला. तुम्ही गोड गोड बोलता पण तुम्ही व्यापारी लोक आहात. व्यापारी लोक असंच करतात आणि सगळ विकून बाहेर पळून जातात मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या हे तुमचेच लोक आहेत. तुम्ही देशात पुन्हा एकदा दंगे भडकवत आहात हे सगळं बंद करा, असंही खासदार राऊत म्हणाले.