साखरचौथ गणरायांना भावपूर्ण निरोप

By Admin | Published: September 21, 2016 03:24 AM2016-09-21T03:24:21+5:302016-09-21T03:24:21+5:30

बाप्पांच्या साखरचौथ उत्सवाची सांगता व मिरवणुकीला पेण शहरात सायंकाळी चार वाजल्यापासून प्रारंभ झाला.

Spiritual greetings to the Ganesh idols | साखरचौथ गणरायांना भावपूर्ण निरोप

साखरचौथ गणरायांना भावपूर्ण निरोप

googlenewsNext


पेण : बाप्पांच्या साखरचौथ उत्सवाची सांगता व मिरवणुकीला पेण शहरात सायंकाळी चार वाजल्यापासून प्रारंभ झाला. सार्वजनिक मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आकर्षक पेहरावासह डीजे, डॉल्बीच्या दणदणाटाला बगल देत पारंपरिक मराठमोळी वाजंत्रीच्या सहाय्याने नाचत, गुलालाची व फुलांची उधळण करीत बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली. प्रत्येक मंडळाचा रुबाब व मिरवणुकांचा वेगवेगळा थाट होता. दोन दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पांना भावभक्तीपूर्वक निरोप देण्यासाठी मिरवणुका निघाल्या. मंगळवारी शहरातील १३५ तर ग्रामीण विभागात २०० च्या वर अशा ३३५ ते ३५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
दोन दिवसांच्या उत्सवात प्राणप्रतिष्ठापना केलेल्या एकापेक्षा एक सरस गणेशमूर्ती, मंडळाची आकर्षक आरास, विविध सांस्कृतिक उपक्रमाचा हा उत्सव मोठा पण कालावधी छोटा असे वर्णन करता येईल. यामध्ये अष्टविनायक मित्रमंडळ, महाकाली, प्रेमनगर मित्र मंडळ शहरातील विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका थाटामाटात निघाल्या होत्या. ढोल ताशे पथकांच्या सलामीसह निघालेल्या विसर्जन मिरवणुका मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत पेण शहरात गणेशभक्तांना पहावयास मिळाल्या. (वार्ताहर)
>ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक
अलिबाग : सोमवारी जल्लोषात आगमन झालेल्या साखरचौथच्या गणरायाला आज भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सार्वजनिक १९३ आणि ३२५ खासगी गणरायांच्या मूर्तींचा त्यामध्ये समावेश होता. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची भव्य मिरवणुका काढण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथच्या गणरायाचे आगमन होेते. विविध सार्वजनिक मंडळांनी रोमहर्षक देखावे उभारले होते. देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती.खासगी गणेशोत्सवाच्या ठिकाणी भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाला सुरवात झाली. मिरवणुकीसाठी पर जिल्ह्यातून ढोल पथकांना पाचारण के लेहोते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
नागोठणे : शिवराम शिंदे मित्रमंडळाच्यावतीने पळस येथील मंदिरात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बबन शिंदे यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारच्या सत्रात शक्ती - तुऱ्यांचा नृत्याचा सामना रंगला.
मुसळधार पाऊस पडत असतानाही नृत्याच्या कार्यक्र मात खंड न पडता चालूच राहिल्याने रसिकांनीही त्याला उत्स्फूर्त दाद दिली हे या कार्यक्र माचे वैशिष्ट्य ठरले. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने पावसातही ग्रामस्थ सहभागी झाले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, लहान मुलांचा हरिपाठ, महिला मंडळाचे पारंपरिक नृत्य आदी विविध कार्यक्र म दोन दिवसात घेण्यात आले. भाद्रपद कृ. पंचमीला मंगळवारी सायंकाळी निडी येथील अंबा नदीत विसर्जन सोहळा संपन्न झाला.

Web Title: Spiritual greetings to the Ganesh idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.