रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 3, 2015 03:09 AM2015-07-03T03:09:58+5:302015-07-03T03:09:58+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त औरंगाबादसह राज्यभरात गुरुवारी रक्तदान शिबिरे घेण्यात आली.

Spontaneous response to blood donation camp | रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

औरंगाबाद : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त औरंगाबादसह राज्यभरात गुरुवारी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. सर्व ठिकाणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.
नागपूर, भंडारा, गोंदिया, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद या ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिरे पार पडली. लोकमत आणि लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादेतील एपीआय कॉर्नर येथील सागर लॉन येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रारंभी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद््घाटन करण्यात आले. शिबिरात उपस्थित अनेक मान्यवरांनी रक्तदान केले.
गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते. तेव्हा वेळीच रक्त मिळणे आवश्यक ठरते. त्यामुळे आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. याच भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिरात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील विभागीय रक्तपेढी आणि लायन्स ब्लड बँकेतर्फे रक्तसंकलन करण्यात आले.
राज्यभरातील विविध शहरांत एकाच दिवशी पार पडलेल्या रक्तदान शिबिरांना शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यातून शेकडो बाटल्या रक्तसंकलन झाले.

Web Title: Spontaneous response to blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.