हेल्दी बेबी कॅम्पला वसईत उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 23, 2016 03:17 AM2016-08-23T03:17:57+5:302016-08-23T03:17:57+5:30
जॉन्सन अँण्ड जॉन्सन आणि लोकमत यांच्यातर्फे रविवारी नीलम-ए- पंजाब हॉल, वसई येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
वसई : हसत्या खेळत्या बाळांच्या उज्ज्वल निरोगी भविष्यासाठी जॉन्सन अँण्ड जॉन्सन आणि लोकमत यांच्यातर्फे रविवारी नीलम-ए- पंजाब हॉल, वसई येथे आयोजित केलेल्या हेल्दी बेबी शिबिराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बालरोगतज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करून आरोग्य सल्ला देण्यात आला.
शिबिराची सुरु वात इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिकच्या वसई शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत जोशी यांनी केलेल्या दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. अर्चना जोशी यांनी स्तनपानावर मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री देशपांडे यांनी बाळांच्या आहाराविषयी योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मौलिक शहा यांनी लसीकरणाच्या आवश्यकतेविषयी उपस्थितांना माहिती दिली. तर डॉ. अमित सामंत यांनी लहान मुलांना येणाऱ्या तापाबाबत काय काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अंजली गोकर्ण यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लहान मुलांवर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ. संजय वाघाणी, डॉ.सिल्विया गोन्सालवीस, डॉ. गौरी आळोज हे ही उपस्थित होते.
एकूण तीन गटांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. यासाठी ० ते १ वर्षे, १ ते ३ वर्षे, आणि ३ ते ५ वर्षे असे तीन गट केले होते.
सकाळी १० वाजल्यापासूनच शिबिराच्या ठिकाणी नोंदणीसाठी पालकांनी चिमुकल्यांसह गर्दी केली होती. या वेळी डोरेमॉन कार्टुन ने सर्वांचे स्वागत केले, त्यामुळे वातावरण हर्षोल्हासित झाले होते. हा उत्साह शिबिर संपेपर्यंत टिकून होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी चिमुकल्यांसाठी विविध खेळण्यांची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या कुटुंबाचे छायाचित्र काढून आकर्षक फ्रेममध्ये मढवून ते त्यांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
या शिबिरात शेकडो बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र आणि जॉन्सनतर्फे हेल्थ किट सप्रेम भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य जोशी यांनी केले. (इव्हेंट प्रतिनिधी)