क्रीडा संघटक जसप्रीत भाटिया यांचे निधन
By Admin | Published: May 14, 2017 12:21 PM2017-05-14T12:21:15+5:302017-05-14T12:21:22+5:30
डा संघटक जसप्रीतसिंग भाटिया यांचे शनिवारी रात्री ९ वाजता हैदराबाद येथे निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 14 - येथील क्रीडा संघटक जसप्रीतसिंग भाटिया यांचे शनिवारी रात्री ९ वाजता हैदराबाद येथे निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा जसबीर, मुलगी जसरीत कौर, वडील राजेंद्रपाल सिंग भाटिया, दोन बहिणी असा परिवार आहे.
जसप्रीतसिंग भाटिया यांना चार दिवसांआधी हैदराबाद येथील एशियन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.
जस्सी नावाने लोकप्रिय असणाºया जसप्रीत भाटिया हे औरंगाबादमधील मनमिळाऊ व लोकप्रिय संघटक होते. लोकमत समूहातर्फे आयोजित क्रीडा महोत्सव, औरंगाबाद लोकमत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पॉवर लिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव तसेच औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी असतानाही त्यांनी विविध खेळातदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. औरंगाबाद शहरात बाऊन्सर्सची संस्कृतीदेखील जसप्रीत भाटिया यांनीच सुरू केली आहे. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता त्यांचे आकाशवाणी, मनजितनगर, शिव अपार्टमेंट येथून निघून सिंधी कॉलनी गुरुद्वारामार्गे त्यांच्यावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.