टाटाच्या वीज ग्राहकांसाठी स्पॉट बिलिंग
By admin | Published: April 28, 2016 02:35 AM2016-04-28T02:35:53+5:302016-04-28T02:35:53+5:30
टाटा पॉवर या वीज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्पॉट बिलिंग सुविधा सुरू केली आहे.
Next
मुंबई : टाटा पॉवर या वीज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्पॉट बिलिंग सुविधा सुरू केली आहे. या सुविधेत मीटर रिडींग घेतल्यानंतर तिथल्या तिथेच अन्य आवश्यक तपशीलांसह वीज बिल प्रिंट करून देणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक उपकरणाचा समावेश आहे. सुविधेमुळे ग्राहकांना मीटर रिडिंग तपासून पाहता येणार आहे. स्पॉट बिलिंग अॅप्लीकेशन सॉफ्टवेअरद्वारे माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करता येईल. नव्या सुविधेमुळे वीज बीलासाठी पारंपारिक तीन दिवसांच्या प्रक्रियेऐवजी केवळ ९० ते १८० सेंकदांचा वेळ लागणार असल्याने ग्राहकांचा वेळ वाचेल, असे टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सेठी यांनी सांगितले.