बनावट कागदपत्रांच्या तपासासाठी पथक नेमा - उच्च न्यायालय

By admin | Published: October 22, 2015 02:14 AM2015-10-22T02:14:37+5:302015-10-22T02:14:37+5:30

नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या बिल्डरांनी फ्लॅट विकताना बनवलेले विक्रीखत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले की नाही, याचा तपास करण्यासाठी

Squad for investigation of fake documents - High Court | बनावट कागदपत्रांच्या तपासासाठी पथक नेमा - उच्च न्यायालय

बनावट कागदपत्रांच्या तपासासाठी पथक नेमा - उच्च न्यायालय

Next

मुंबई : नवी मुंबईतील दिघा येथे बेकायदेशीर इमारती उभारणाऱ्या बिल्डरांनी फ्लॅट विकताना बनवलेले विक्रीखत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले की नाही, याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पथक नेमणे आवश्यक आहे, अशी सूचना बुधवारी उच्च न्यायालयाने केली.
दिघा येथील बेकायदेशीर बांधकामांसदर्भात मयुरा मारू व राजीव मिश्रा यांनी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने वरील सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तांना केली.
या प्रकरणी अद्याप कोणाला अटक केली आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर अ‍ॅड. ठाकूर यांनी संबंधित बिल्डर चौकशीसाठी उपलब्ध नसल्याचे खंडपीठाला सांगितले. बांधकाम नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या विचाराबाबत खंडपीठाने म्हटले की, राज्य सरकारने उल्हासनगरसाठीही असेच धोरण आखले. परंतु येथे पाकिस्तानातील निर्वासित आले होते, पण नवी मुंबईबाबत अशी भूमिका का? हे आम्हाला न पटणारे आहे. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २८ आॅक्टोबर रोजी आहे.

Web Title: Squad for investigation of fake documents - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.