आत्महत्यांनी पथक हादरले

By admin | Published: December 15, 2014 04:30 AM2014-12-15T04:30:53+5:302014-12-15T04:30:53+5:30

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले

The squad shook the suicide | आत्महत्यांनी पथक हादरले

आत्महत्यांनी पथक हादरले

Next

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले. औरंगाबादेत दुष्काळावर चर्चा सुरू असताना मराठवाड्यातच चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले.
गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यात एका महिलेसह तीन, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दुपारीच केंद्राचे पथक येथे दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात मराठवाड्यातील स्थितीची औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, नाशिक व अमरावतीचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले व ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडून माहिती घेतली. सोमवारपासून हे पथक पाहणी करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

>मराठवाड्यात चौघांचा आत्मघात

संदीपवर कर्ज फेडण्याची विवंचना
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या संदीपने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले, असे त्याचे वडील गुणवंत बक्केवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संदीपने मराठवाडा ग्रामीण बँकेच्या उमरी बाजार शाखेतून पीककर्ज घेतले होते़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़

> महिला शेतक-याचा मृत्यू
पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या महिला शेतकरी अन्नपूर्णा आनंदा चौधरी (४७, रा. जैतपीर, जळगाव) यांनी रविवारी संध्याकाळी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Web Title: The squad shook the suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.