जळगावातून सुरेशदादाच उमेदवार !

By Admin | Published: May 14, 2014 12:55 AM2014-05-14T00:55:54+5:302014-05-14T05:03:56+5:30

घरकूल प्रकरणात आमदार सुरेशदादा जैन हे न्यायालयीन लढा देत आहेत. त्यात ते यशस्वी ठरल्यास जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तेच उमेदवार असतील.

Sreshdadha candidate from Jalgaon! | जळगावातून सुरेशदादाच उमेदवार !

जळगावातून सुरेशदादाच उमेदवार !

googlenewsNext

जळगाव : घरकूल प्रकरणात आमदार सुरेशदादा जैन हे न्यायालयीन लढा देत आहेत. त्यात ते यशस्वी ठरल्यास जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तेच उमेदवार असतील. उमेदवार बदलाचा प्रश्नच येत नसल्याचे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाचोरा येथे सेनेचा मेळावा व जळगावात आयोजित बैठकीसाठी ते मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीपूर्वी पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळेल. किमान ३५ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. लोकसभेनंतर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही चांगले यश मिळवून विधानसभेवर भगवा फडकविण्यात येईल. परंपरागत मतदारसंघ कायम जिल्ह्यात सेनेच्या वाट्याला ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. सेनेच्या ताब्यात परंपरागत जे मतदारसंघ आहेत, ते कायम राहतील, त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. अदलाबदलचीही कुणाचीही मागणी नाही. शिवसैनिकांनी आग्रह धरल्यास मात्र विचार करण्यात येईल. घरकूल प्रकरणात आमदार सुरेशदादा जैन हे कारागृहात असल्याने उमेदवार बदलणार का? असे एका पत्रकाराने विचारले असता मिर्लेकर म्हणाले, आमदार सुरेशदादा हे सध्या न्यायालयीन लढा देत आहेत. ते यशस्वी ठरले तर तेच उमेदवार असतील. आज तरी पक्षापुढे त्यांच्या उमेदवारीचा कोणताही मुद्दा किंवा अडचण नाही.

Web Title: Sreshdadha candidate from Jalgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.