एसआरपीच्या जवानांना मिळणार ३० साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन! मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 09:54 PM2019-07-07T21:54:08+5:302019-07-07T21:54:44+5:30

राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारावर जवांनासाठी एक खुशखबर आहे.

SRP soldiers to get 30 weekly vacation pay! Proposal submitted to the government for approval | एसआरपीच्या जवानांना मिळणार ३० साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन! मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर

एसआरपीच्या जवानांना मिळणार ३० साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन! मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर

googlenewsNext

- जमीर काझी

मुंबई  - राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारावर जवांनासाठी एक खुशखबर आहे. नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी ५-५ महिने ‘ऑन ड्युटी’ तैनात असल्याने त्यांच्या बुडणाऱ्या सर्व साप्ताहिक सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना त्याचे वेतन मिळणार आहे. सध्या मिळणा-या आठ सुट्ट्यांच्या वेतनाऐवजी त्यांना विशेष बाब म्हणून त्याची मर्यादा ३० दिवसापर्यत वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

एसआरपीकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडून मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविला आहे. पोलिसांनी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय राज्यात गेल्या तीन वर्षापासून लागू आहे. मात्र त्यासाठी एका कॅलेडर वर्षात जास्तजास्त ८ दिवसाची मर्यादा आहे. एसआरपी जवानांना मात्र बंदोबस्तामुळे त्यांना दरवर्षी ३०-३५ साप्ताहिक सुट्ट्यांना मुकावे लागते.त्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यास जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या अखत्यारित एसआरपी हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. महापूर, दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्थानिकांना मदतीसाठी त्यांना पाठविले जाते. त्याचबरोबरच नक्षलग्रस्त भाग,घातपाती घटना, निवडणूका व अन्य महत्वाच्या कामावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यात आवश्यकतेनुसार बंदोबस्तासाठी पाचारण केले जाते. प्रसंगी काहीवेळा शेजारी राज्यातही बंदोबस्तासाठी पाठविले जाते. त्यासाठी१६ बटालियनातर्गंत(तुकडी) एकुण २० हजारावर जवानांची कुमूक राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. दर दोन वर्षांनी प्रत्येक बटालियनला नक्षलग्रस्त भागात पाच महिन्यासाठी पाठविले जाते. तर अन्य ठिकाणच्या बंदोबस्तासाठी किमान दोन महिने तैनात रहावे लागते. या कालावधीत त्यांच्या साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते. मात्र सरकारच्या नियमानुसार केवळ ८ दिवसांच्या सुट्टीचा पगार मिळत असल्याने त्यांच्या अन्य सुट्ट्याचे वेतन किंवा बदली सुट्टी दिली जात नव्हती. त्याबाबत जवानांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांच्या राज्यस्तरीय वृंद परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांना त्यासंबंधी प्रस्ताव बनविण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी एसआरपी जवानांना वर्षाला ३० साप्ताहिक सुट्ट्यांचा मोबदला दिला जावा, असा प्रस्ताव ३ मे रोजी महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आता अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
 
साप्ताहिक सुट्टीच्या वेतनासाठी अट
राज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्या एक दिवसाचे वेतन देण्याचा आदेश लागू केला आहे. परंतू त्यातर्गंत एका वर्षात जास्तीजास्त ८ साप्ताहिक सुट्टयांचे वेतन देण्याची मर्यादा आहे. एसआरपीच्या जवांनाना मात्र ड्युटीमुळे वर्षाला किमान २० ते ३० साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते.
 
एसआरपीच्या मुंबई, नवी मुंबई,पुणे,नागपूरसह राज्यभरात एकुण १३ बटालियन आहेत. तर ३ आयआरबीच्या कंपन्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये साधारण बाराशे तर तेराशे जवानांचा समावेश असतो.

Web Title: SRP soldiers to get 30 weekly vacation pay! Proposal submitted to the government for approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.