BREAKING: दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:19 PM2021-12-21T15:19:53+5:302021-12-21T15:28:55+5:30

ssc exam date: १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा

ssc exam date 2022 board declares timetable | BREAKING: दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

BREAKING: दहावीच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

Next

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलचा संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं. यानंतर आता परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.  

दहावीची परीक्षा या १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहे. याबद्दलची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली. आता सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

दहावीच्या परिक्षेचं वेळापत्रक-
१५ मार्च- प्रथम भाषा
१६ मार्च- द्वितीय वा तृतीय भाषा
२१ मार्च- हिंदी
२२ मार्च- संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा
२४ मार्च- गणित भाग-१
२६ मार्च- गणित भाग-२
२८ मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर २

निकाल कधी?
इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Read in English

Web Title: ssc exam date 2022 board declares timetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ssc examदहावी