एसटी कृती समितीला ५२ टक्के वेतनवाढ

By admin | Published: July 8, 2017 03:45 AM2017-07-08T03:45:57+5:302017-07-08T03:45:57+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या १३ संघटनांनी एकत्रित येऊन, तयार केलेल्या कृती समितीने गुरुवारी कर्मचाऱ्यांचा

ST acts committee raises 52% salary | एसटी कृती समितीला ५२ टक्के वेतनवाढ

एसटी कृती समितीला ५२ टक्के वेतनवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या १३ संघटनांनी एकत्रित येऊन, तयार केलेल्या कृती समितीने गुरुवारी कर्मचाऱ्यांचा सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीच्या वेतन कराराचा मसुदा एसटीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल यांना सादर केला. या मसुद्यात कर्मचाऱ्यांना ५२ टक्के वेतनवाढ देण्याची मागणी केल्याचे कृती समितीचे निमंत्रक हिरेन रेडकर यांनी सांगितले.
रेडकर म्हणाले की, परिवहनमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनाही मसुद्याची प्रत दिलेली आहे. मसुद्यात एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचा वेतन करार एकाच वेळी करण्याची मागणीही कृती समितीने केली आहे. एसटीत १३५ प्रवर्ग असून, करार करताना या सर्व प्रवर्गांना ३१ मार्च २०१६ सालच्या बेसिकमध्ये १२५ टक्के महागाई भत्ता वाढवून येणाऱ्या बेसिकवर ५२ टक्के वाढ देण्याचे आवाहन कृती समितीने महामंडळाला केले आहे. मान्यताप्राप्त संघटनेकडून करारास विलंब होत आहे.

Web Title: ST acts committee raises 52% salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.