प्रवासीसेवेच्या ६९ व्या वर्षात एसटी बस

By Admin | Published: June 1, 2017 01:58 AM2017-06-01T01:58:41+5:302017-06-01T01:58:41+5:30

राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बससेवेचा ६९ वा वर्धापन दिन १ जूनला

ST bus in the 69th year of passenger service | प्रवासीसेवेच्या ६९ व्या वर्षात एसटी बस

प्रवासीसेवेच्या ६९ व्या वर्षात एसटी बस

googlenewsNext

महेंद्र कांबळे/ लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बससेवेचा ६९ वा वर्धापन दिन १ जूनला साजरा होत आहे. ‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीसेवेला खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करावी लागत आहे. शहरी, तसेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावत आहे. त्यामुळे एसटी बसच्या सेवांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, तरच सार्वजनिक वाहतूक सेवेतील एसटी बस खासगी प्रवासी कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील, असे मत प्रवाशांनी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांनीदेखील व्यक्त केले. सेवा सुधारत असताना प्रवासी, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा देण्याची आवश्यकता आहे.
१ जूनला एसटीचा वर्धापन दिन साजरा होत असताना प्रवासी आणि एसटी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यातून अनेक प्रश्न पुढे आले. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या स्थापनेला ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. पूर्वी गावोगावी जाण्यासाठी एसटी बसच एकमेव पर्याय खेड्यापाड्यासह शहरी प्रवाशांनादेखील होता. जागतिक स्तरावर स्पर्धा वाढल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, आजही एसटी बसला ग्रामीण भागातून पसंती आहे. बसगाड्यांमध्येदेखील दिवसेंदिवस बदल होत आहेत.
‘लाल डब्यां’च्या गाड्यांची जागा चांगल्या गाड्यांनी घेतली. त्यानंतर शहरी भागात वातानुकूलितगाड्या देखील धावू लागल्या आहेत. परंतु प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा देण्याची गरज असल्याचे मत बारामती एसटी स्थानकात आलेल्या प्रवाशांनी व्यक्त केले. शहरात, तालुकास्तरावर एसटी महामंडळाची बसस्थानके आहेत. त्या ठिकाणी प्रवाशांना सुविधा दिल्या जाव्यात. त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरील चालक, वाहकांना अद्ययावत विश्रांतीगृह, महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विश्रांतीगृह असण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे. कमी मनुष्यबळात खासगी वाहनांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे अधिकारीच सांगत आहेत़

वेतनवाढीचा करार रखडला...
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार रखडला आहे. वेतनवाढीसाठी संपाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता आहे. गुजरात आणि कर्नाटक सरकारने तेथील एसटी बस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेतले आहे. त्यांना ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेदेखील निर्णय घ्यावा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेची आहे. वेतनवाढीचा करार करावा, अशी मागणी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत, असे मोरे यांनी सांगितले.

बस स्थानक परिसरातच तात्पुरत्या निवासाची सोय गरजेची
काळानुसार बसस्थानकांचा चेहरादेखील बदलण्याची गरज आहे. महामंडळाकडे मोक्याच्या जागांवर बसस्थानके आहेत. या बसस्थानकांचे पुनर्निर्माण करण्याची गरज आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या अथवा अनेक प्रवाशांना रात्रीच्या वेळी गाड्या मिळत नाहीत, त्यांच्या सोयीसाठी अत्यल्प दरात बसस्थानकाच्या आवारातच राहण्याची सोय केल्यास एसटीच्या उत्पन्नातदेखील वाढ होणार आहे.
त्याचबरोबर प्रवाशांची गैरसोय होणार नाही. काही गरीब कुटुंबांना रात्रीच्या वेळी गाडीची सुविधा नसल्याने बसस्थानकात केलेल्या मुक्कामाच्या रात्री गुंडांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे.
या घटना टाळण्यासाठी असलेल्या जागेचा वापर करून प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. हा प्रस्ताव अगोदरच्या सरकारला देण्यात आला होता. नव्या सरकारला दिला, मात्र त्यावर गांभीर्याने विचार होत नसल्याचे मत कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक मोरे यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागात चांगल्या गाड्या द्या...
एसटीच्या सेवेत आता स्टील बॉडी बस दाखल होत आहेत. सुरुवातीला मोठ्या शहरात या बसची सेवा देत असताना त्याची ग्रामीण भागातदेखील या बस देण्याची गरज आहे. शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव न करता, जास्तीत जास्त ग्रामीण भागावरदेखील लक्ष केंद्रित करावे, असे प्रवाशांचे मत आहे.

विश्रांतीगृह नको रे बाबा...
एसटी कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या आवारात असणारे विश्रांती कक्ष महिला, पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आहेत. काही ठिकाणी चांगली सुविधा आहे. मात्र, काही ठिकाणी विश्रांती नको रे बाबा म्हणण्याची वेळ येते. जालना, धुळे या लांब पल्ल्यांच्या ठिकाणी कर्मचारी विश्रांतीगृहात थांबण्याऐवजी ‘कॉट बेसीस’वर राहणे पसंत करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ बसते, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी संघटनांच्या माध्यमातून किरकोळ दुरुस्ती करून घेतली जाते. परंतु राज्यातीलसर्व बसस्थानकांना कायापालट करण्याची गरज असल्याचे कर्मचारीदेखील सांगतात.

विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वतंत्र सुविधा आवश्यक

विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वतंत्र सुविधा दिल्या पाहिजेत. आजही गाड्यांची गैरसोय असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. विशेषत: मुलींसाठी मिनीबससेवा सुरू करण्याचा विचार महामंडळाने करावा. नियमित प्रवाशांबरोबर प्रवास करताना विद्यार्थिनींना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागते.

त्यामुळे मुलींसाठी सर्व मोठ्या बसस्थानकातून स्वतंत्र गाड्यांची सोय असावी. त्यामुळे शिक्षणाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. केवळ प्रवासाची गैरसोय असल्याने विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही, असे मत महाविद्यालयीन

Web Title: ST bus in the 69th year of passenger service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.