ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

By नितीन जगताप | Published: June 8, 2023 09:22 PM2023-06-08T21:22:45+5:302023-06-08T21:23:13+5:30

Madhavi Salve: एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होतंं. परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत. 

ST Bus: Now the driver of ST in the hands of women, Madhavi Salve became the first woman driver of ST | ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

ST Bus: आता महिलांच्या हाती एसटीचे सारथ्य, माधवी साळवे बनल्या एसटीच्या पहिल्या महिला चालक 

googlenewsNext

- नितीन जगताप
मुंबई :  जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी अस नारीशक्तीच्या बाबतीत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. चूल आणि मूल" यावर मर्यादित न राहता पाळण्याच्या दोरीसह, बसची बेलदोरी हाती धरत बस कंडक्टरची कामगिरी देखील सक्षमपणे पार पाडली. परंतु अद्याप एखादी महिला बस चालवते आहे हे दृश्य खेड्यापाड्यात दुर्मिळ होत.परंतु आपल्या लालपरीचे सारथ्य करताना महिला दिसणार आहेत.  आता राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक सुद्धा रुजू झाल्या असून नुकतेच  माधवी साळवे यांनी  "सिन्नर - नाशिक" मार्गावर एसटी.बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

सिन्नर तालुक्यातील प्रवाशांचे कौतुकाचे बोल सर्व महिला चालकांना प्रोत्साहन देत आहे. महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटात ५० टक्के  सवलत देऊन तेवढ्यावरच न थांबता राज्य परिवहन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी देत आहे याची  नागरिक प्रशंसा करत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे आश्वासक पाऊल आहे.

सन. 2019 च्या भरती प्रक्रियेत 206 महिला चालक तथा वाहक या पदासाठी निवडल्या गेल्या.  त्यांन एसटी एसटी महामंडळाने स्वतःच्या खर्चाने अवजड वाहन चालवण्याचे  एक वर्ष ट्रेनिंग दिले. पुढे त्यांना एक वर्ष हेवी व्हेईकल चालवण्याचा अनुभव दिली.(जो एसटी चा चालक बनण्यासाठी आवश्यक आहे)त्यानंतर त्यांची रीतसर एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत आज रुजू करून घेण्यात आले आहे. 


एकूण पात्र उमेदवार - २०६
अवजड वाहन चालन प्रशिक्षन सुरु-  ९
प्राथमिक वाहन चाचणी बाकी - २४
८० दिवसाचे प्रशिक्षण सुरु - ७३ 
  प्रशिक्षण पूर्ण - २० 
गैरहजर /अपात्र - ४८
वैद्यकीय तपासणी प्रलंबित - ४ 
नेमणूक दिलेल्या महिला - २८


२०१९ मध्ये थेट भरती योजनेत तब्बल २०६ महिला चालक पात्र ठरल्या होत्या आणि त्यापैकी आतापर्यंत २८ जणांची भरती करण्यात आली आहे.वजड वाहन परवाना असलेल्या महिला चालकांना तीन महिन्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले, तर ज्यांच्याकडे हा परवाना नव्हता त्यांना पूर्ण एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आले.  त्याच्या शेवटी एक चाचणी घेण्यात आली आणि ज्यांनी ती उत्तीर्ण केली त्यांना आणखी ८० दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.   
 - शेखर चन्ने , उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , एसटी महामंडळ 

Web Title: ST Bus: Now the driver of ST in the hands of women, Madhavi Salve became the first woman driver of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.