एसटीची ‘प्रवासी सुरक्षितता’ मोहीम सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:58 AM2017-07-28T04:58:10+5:302017-07-28T04:58:16+5:30

खेडोपाडी सुविधा देणाºया एसटी बसच्या अपघातांत घट झाली आहे. एप्रिल २०१६ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे ३५ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीने वाहतूक केली.

ST bus, Traveler Safety | एसटीची ‘प्रवासी सुरक्षितता’ मोहीम सुसाट

एसटीची ‘प्रवासी सुरक्षितता’ मोहीम सुसाट

Next

मुंबई : खेडोपाडी सुविधा देणाºया एसटी बसच्या अपघातांत घट झाली आहे. एप्रिल २०१६ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे ३५ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीने वाहतूक केली. या प्रवासात ४७३ अपघात घडले; यात सुमारे ६० प्रवाशांचा मृत्यू झाला. गतवर्षी याच कालावधीत सुमारे ८० प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते. दरम्यान, प्रवासी अपघात निधीसाठीची १५० कोटींची रक्कम एसटी प्रशासनाकडे शिल्लक असून, ७४ कोटी निधीपोटी वितरित करण्यात आले आहेत.
राज्यात एसटी प्रशासनाच्या वतीने चालक-वाहकांसाठी विभागस्तरीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांत वाहकांना रोजच्या सुरक्षिततेसह बसची निगा कशी राखावी, याबाबत माहिती देण्यात आली. एप्रिल १६ ते मे १७ या कालावधीत १७ हजारांहून जास्त एसटी बसमधून ३५ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे ४७३ अपघात झाले. यात सुमारे ६० प्रवासी मरण पावले तर ७५०पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. गतवर्षी या कालावधीत झालेल्या ४८४ अपघातांत सुमारे ८० प्रवाशांचा मृत्यू झाला. यंदा अपघातांचे प्रमाण घटले आहे. भविष्यात एसटी प्रशासन ‘शून्य अपघात’ मोहीम राबवणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

Web Title: ST bus, Traveler Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.