एसटी बसेस लवकरच नव्या रूपात

By admin | Published: November 20, 2015 02:01 AM2015-11-20T02:01:51+5:302015-11-20T02:01:51+5:30

महामंडळाचा निर्णय; प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार.

ST buses soon | एसटी बसेस लवकरच नव्या रूपात

एसटी बसेस लवकरच नव्या रूपात

Next

बुलडाणा : तुटलेल्या खिडक्या, फाटलेले सिट कव्हर, ठिकठिकाणी पत्र्यांचे ठिगळ, तोच लाल-पिवळा डब्बा, त्यावर शासकीय जाहीरातींची पत्रकं.. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचे वर्षानुवर्षापासूनचे हे रूप बदलणार आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवासांचा आनंद देता यावा, या दृष्टिकोनातून बसेस ह्यमॉडर्नह्ण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बसगाड्यांमधील प्रस्तावित बदलानुसार, संकटकालीन खिडकी काढून त्याऐवजी दोन दरवाजे लागणार आहेत. टपावरील लगेज कॅरिअर काढून, प्रवाशांच्या आसनाखालीच सामान ठेवण्याची व्यवस्था नविन बसमध्ये केली जाणार आहे. शेवटच्या आसनावर बस चालकाच्या विश्रांतीसाठी झोपण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या मूलभूत बदलांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा महामंडळाला विश्‍वास आहे. सुरक्षित प्रवास म्हणून आजही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसकडे बघितले जाते. मोठय़ा शहरापासून तर वाडी-तांड्यापर्यंत रोज हजारोंच्या संख्येत एसटी बसेस धावतात; परंतु कित्येक वर्षांपासून एकाच पद्धतीच्या बसेस, तेच रूप, तोच रंग आणि तिच बैठक व्यवस्था अशी स्थिती आहे. आता बसगाड्यांचे हे रूप बदलणार असून, त्यांची सुरूवात मोठय़ा शहरातून धावणार्‍या बसेसपासून केली जाणार आहे. आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना बसमधून तातडीने बाहेर पडता यावे, यासाठी एसटीच्या मागे आपात्कालीन खिडकी राहणार आहे. गर्दीच्या काळात प्रवासी या आपात्कालीन दारातून आत शिरण्याचा प्रयत्न करतात. या गडबडीत प्रवासी खाली पडून जखमीही होतात. हा प्रकार थांबविण्याकरिता खिडकीच्या कोंड्याला रेल्वेच्या धर्तीवर विशिष्ट काच बसविले जाणार आहे. प्रवाशांना हा काच फोडून कोंडा उघडल्यानंतरच खिडकीच्या बाहेर पडता येईल. बसच्या खालच्या भागात स्टेपनीची व्यवस्था असून, तिथेच मोठय़ा डिक्कीची व्यवस्था राहणार आहे. या डिक्कीतच प्रवाशांचे सामान ठेवण्याची व्यवस्था असणार आहे.

Web Title: ST buses soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.