एसटी संप : उच्च न्यायालयात दोन याचिक दाखल, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:28 AM2017-10-19T05:28:36+5:302017-10-19T05:28:52+5:30
एसटीच्या कर्मचा-यांच्या बेमुदत संपाविरुद्ध दोन याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.
मुंबई : एसटीच्या कर्मचा-यांच्या बेमुदत संपाविरुद्ध दोन याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.
दिवाळीची सुटी असल्याने लोक मुंबईबाहेर जाणार आहेत तर काही बाहेरून मुंबईत येणार आहेत. मात्र, संपामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा संप बेकायदा असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका पत्रकार जयंत साटम यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
एसटी संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे हा संप चुकीचा असून तो ऐन सणासुदीच्या दिवशी करून प्रवाशांना वेठीस धरू नये असे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे साटम यांच्याप्रमाणेच एसटी संपासंदर्भातील आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
न्या. संदीप शिंदे यांनी या दोन्ही याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.
एसटी कर्मचाºयांच्या मागण्या योग्य असल्या, तरी सणाच्या आदल्या दिवशीच संपावर जाऊन प्रवाशांना वेठीस धरणे हे योग्य नाही, असे अॅड. पूजा थोरात व अॅड. माधव थोरात यांनी म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने यासंबंधी एका समितीची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचाºयांच्या सर्व तक्रारी सविस्तरपणे ऐकून त्या सोडविण्यासाठी एखादी समिती असायला हवी. त्यांनी याबाबत थोडे संशोधन करून काय प्रस्ताव ठेवणे योग्य ठरेल, हेही पाहायला हवे, असे मत न्या. शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रवाशांना नाहक त्रास
दिवाळीची सुटी असल्याने लोक मुंबईबाहेर जाणार आहेत तर काही बाहेरून मुंबईत येणार आहेत. मात्र, संपामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा संप बेकायदा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.