एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:55 AM2023-09-22T08:55:45+5:302023-09-22T08:56:14+5:30

राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे.

ST dirty? The officer will be fined Rs.500; Inspection from October 1 across the state | एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी

एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी

googlenewsNext

मुंबई - एसटी बस व स्थानकात स्वच्छता राखली जावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आले, परंतु एसटीच्या अस्वच्छ बसेस रस्त्यांवर दिसत आहेत. अस्वच्छ बसेस दिसल्यास आगार व्यवस्थापकाला ५०० रुपयांच्या दंडाचे आदेश काढले आहेत.

बसची स्वच्छता तपासणी शक्यतो बस मार्गस्थ होत असताना फलाटावर वा आगारात करावी.  
बसची स्वच्छता करणे व बसच्या आतील केरकचरा झाडणे, उचलणे व साफ करणे.
बसचे दरवाजे आतून व बाहेरुन धुऊन व पुसून स्वच्छ करणे. 
आतील / बाहेरील सर्व अनधिकृत स्टिकर्स /पोस्टर्स काढणे.
सीट, बॅकसीट्स, हेडरेस्ट व पाठीमागील भाग स्वच्छ करणे.
खिडक्या आतील व बाहेरील बाजूने स्वच्छ / पडदे स्वच्छ ठेवणे.
चालक केबिन व डॅश बोर्ड तसेच हॅटरॅक पुसून स्वच्छ करणे.
प्रवासी सामान (लगेज) बुथ पाण्याने धुऊन स्वच्छ करणे.
चालकासमोरील काच स्वच्छ करणे, स्टिकर्स, डाग पुसून टाकणे.

राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे. या अभियानात बसेसच्या स्वच्छतेसाठी १०० पैकी १० गुण दिले आहेत. अभियान सुरू होऊन तब्बल ५ महिने होऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने एसटी महामंडळ प्रशासनाकडून या अभियानाबद्दल सूचना केल्या आहेत.

Web Title: ST dirty? The officer will be fined Rs.500; Inspection from October 1 across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.