ST Employees Strike: कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:37 PM2022-02-11T19:37:25+5:302022-02-11T19:37:55+5:30
ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. तरीही सरकार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यापेक्षा तो संप वाढला पाहिजे, चिघळला पाहिजे यासाठी सरकार कट रचत असल्याचा आरोप भाजपा विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यामागे मोठे इप्सित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकीकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आवाहन द्यायचे, दुसरीकडे एसटीचे कसे ५० कोटी, १०० कोटींचे नुकसान झाले याच्या नोटीसा पाठवायच्या. तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतो, तेव्हा त्याला चार्जशिट द्यायची, असा प्रकार सुरु आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. तरीही सरकार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे. या कर्मचाऱ्यांना काढून टाकायचे आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करायची. म्हणजे त्यातून नोकर भरती घोटाळा करता येईल असा प्लॅन सरकारचा असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.