एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:57 AM2019-06-22T03:57:38+5:302019-06-22T03:57:56+5:30

आता एसटी कर्मचाऱ्यांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार

ST employees' subsidy doubled | एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपदानात दुप्पट वाढ

Next

वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या उपदान (ग्रॅच्युईटी) रकमेत केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता एसटी कर्मचाऱ्यांना दहा लाखांऐवजी वीस लाख रुपये उपदान रक्कम मिळणार आहे. २९ मार्च २०१८ पासून याचा लाभ देण्यात येत असून, या तारखेला किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या किंवा सेवेतून कमी केलेल्या परंतु उपदानास पात्र कर्मचाºयांना यातील फरकाची रक्कम मिळणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात २० जून रोजी परिपत्रक जारी करून सर्व विभाग नियंत्रकांना याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

केंद्र शासनाने उपदान प्रदान अधिनियम १९७२ नुसार द्यावयाच्या उपदानाची कमाल मर्यादा १७ मे २०१० च्या अध्यादेशाद्वारे १० लाख रुपये केली होती. कर्मचारी वर्ग खाते परिपत्रक २८ जून २०१० नुसार ही कमाल मर्यादा एसटी महमांडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांनाही लागू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने २९ मार्च २०१८ ला राजपत्रित अधिसुचना काढून उपदानाच्या कमाल मर्यादेत सुधारणा केली आहे. यानुसार आता उपदानाची मर्यादा १० लाखांहून २० लाख करण्यात आली असून, ही कमाल मर्यादा २९ मार्च २०१८ पासूनच लागू करण्याची अधिसुचना केंद्र शासनाच्या श्रम, रोजगार मंत्रालयाने प्रसारित केली आहे. महामंडळाने अधिसुचनेच्या अंमलबजावणीबाबत २० जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांना पुरवणी उपदानासह उपदानाची कमाल मर्यादा २० लाख लागू केली आहे. यानुसार मार्च २०१८ मध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले किंवा अन्य कारणांमुळे २९ मार्च २०१८ पासून सेवेतून कमी झालेल्या; परंतु उपदानास पात्र असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जुन्या कमाल मर्यादेप्रमाणे अदा केलेल्या उपदानाप्रकरणी नवीन कमाल मर्यादेनुसार फरकाचे देयक मिळेल.

Web Title: ST employees' subsidy doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.