नव्या गणवेशावर एसटी कर्मचारी नाखूश! सर्वेक्षणातील निष्कर्ष : ९० टक्के कर्मचा-यांनी दर्शविली नापसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:53 AM2018-01-08T03:53:58+5:302018-01-08T03:54:58+5:30

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी राज्यभर नव्या गणवेश वितरणाचा सोहळा आयोजित केला होता. मात्र, नव्या गणवेशावर कर्मचारी वर्ग नाखूश दिसत आहे.

 ST employees unhappy with new uniform! The findings of the survey: 90 percent of employees dislike showing | नव्या गणवेशावर एसटी कर्मचारी नाखूश! सर्वेक्षणातील निष्कर्ष : ९० टक्के कर्मचा-यांनी दर्शविली नापसंती

नव्या गणवेशावर एसटी कर्मचारी नाखूश! सर्वेक्षणातील निष्कर्ष : ९० टक्के कर्मचा-यांनी दर्शविली नापसंती

Next

महेश चेमटे
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी राज्यभर नव्या गणवेश वितरणाचा सोहळा आयोजित केला होता. मात्र, नव्या गणवेशावर कर्मचारी वर्ग नाखूश दिसत आहे. राज्यभर गणवेश वितरण सोहळ्याची केवळ ‘शोबाजी’ करण्यात आली. मुळात एसटीच्या नव्या गणवेशात काहीच विशेष बदल झालेला नाही. नव्या गणवेशाबाबत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९० टक्के कर्मचाºयांनी या गणवेशाला नापसंती दर्शवली आहे.
मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात गणवेश वाटप ‘इव्हेंट’ पार पडला. एकाच वेळी राज्यभर गणवेश वितरण सोहळा घेण्यात आला. तथापि, गणवेशाचे हलके कापड, अयोग्य माप या प्रमुख कारणांमुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. एसटी महामंडळाने गणवेश वाटपानंतर राज्यभर एक सर्वेक्षण केले. यात ‘एसटी कर्मचा-यांसाठी नव्याने आलेला गणवेश तुम्हाला आवडला का?’ या प्रश्नावर हो, नाही आणि सांगता येत नाही, असे तीन पर्याय देण्यात आले होते. समाजमाध्यमांवर घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणावर ९० टक्के कर्मचा-यांनी ‘नाही’ हा पर्याय निवडत नापसंती व्यक्त केली, तर ६ टक्के कर्मचाºयांनी सांगता येत नाही, हा पर्याय निवडला. केवळ ४ टक्के कर्मचा-यांनी एसटीच्या नव्या गणवेशाला पसंती दिली.
एसटी संघर्ष गु्रपमध्ये राज्यभरातील कर्मचारी-अधिका-यांचा समावेश आहे. या ग्रुपच्या समाजमाध्यमांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. गणवेश खरेदीसाठी ७३ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. कापडाची किंमत, शिलाई आणि कापडाची कंपनी आणि कोटेशन या मुद्द्यांवर माहिती अधिकाराखाली माहिती मागवावी, अशी मागणी आता एसटी कर्मचारी करत आहेत.
नाशिक, उस्मानाबाद येथील कर्मचाºयांनी गणवेश वितरण सोहळा म्हणजे केवळ ‘शोबाजी’ असल्याचा आरोप केला. औरंगाबाद येथील कर्मचा-यांनी अयोग्य माप, तसेच गणवेश खराब असल्यामुळे ते परत करत कार्यक्रमावर बहिष्कार घातला. चिखलठाणा कार्यशाळेतदेखील अयोग्य मापामुळे कर्मचा-यांनी गणवेश परत करत, नव्या गणवेशाचा निषेध व्यक्त केला.
कर्मचा-यांच्या ‘निवडक’ प्रतिक्रिया
‘कपडे बदलने से इंसान की जिंदगी नहीं बदलती और न ही उसकी औकात बदलती है.’ मंत्री महोदयजी. - गुड्डू पठाण
अजून गणवेश दिला नाही, दिल्यावर बोला, नको त्या गोष्टीवर बोलू नका. - समाधान देवकर
गणवेश आमच्या हक्काचा आहे, उपकार केल्यासारखे दाखवू नका. - रघुनाथ गाडे

Web Title:  ST employees unhappy with new uniform! The findings of the survey: 90 percent of employees dislike showing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.