एसटी इथेनॉलवर!
By admin | Published: October 2, 2016 01:20 AM2016-10-02T01:20:26+5:302016-10-02T01:20:26+5:30
राज्यातील सर्व एस़टी़ तसेच महापालिकांच्या बसेस इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़.
- शिवाजी सुरवसे, सोलापूर
राज्यातील सर्व एस़टी़ तसेच महापालिकांच्या बसेस इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़. एस़टी़ महामंडळाच्या सुमारे २२ हजार बसेस आहेत़ विविध महापालिकांच्या देखील मोठ्या प्रमाणावर बस आहेत़ या सर्व बस डिझेलऐवजी इथेनॉलवर चालविण्यासाठी इंजिनात बदल करावा लागतो़ त्यासाठी शासनाकडून देखील आर्थिक मदत देण्याचा विचार सुरू आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील याबाबत सकारात्मक आहेत़, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
सन २०११-१२ मध्ये ४़७८ कोटी लिटर्स, सन २०१२-१३ मध्ये ३़२० कोटी लिटर्स, सन २०१३-१४ मध्ये ७़२० कोटी लिटर्स तर सन २०१४-१५ मध्ये १४़२० कोटी लिटर्स आणि यंदाच्या वर्षी २०१५-१६ मध्ये
१५ सप्टेंबरपर्यंत २३़४२ कोटी
लिटर्स इथेनॉल पुरवठा राज्याकडून केला आहे़
मागणीप्रमाणे निम्मादेखील इथेनॉल पुरवठा राज्य करू शकत नाही़ त्यामुळे अजूनही इथेनॉल निर्मितीला मोठा वाव आहे़ सध्या इथेनॉलसाठी सुमारे ४९ रुपये प्रतिलिटर्स भाव मिळतो़ त्यामुळे कारखान्यांना देखील याचा मोठा फायदा मिळत आहे़
दरवर्षी १५२ कोटी लीटर्सची गरज
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि गोवा या राज्यांत इंधनामध्ये सध्या १० टक्के इथेनॉल मिसळले केले जात आहे. तर उर्वरित राज्यात ५ टक्के़ पाच टक्क्यांप्रमाणे हिशोब केला तरी देशाला दरवर्षी १५२ कोटी लीटर्स इथेनॉलची गरज आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.